सिंदखेड लपाली शिवारात गांजाचा पेरा आढळल्याने खळबळ * 40 किलो गांजा जप्त; एक अटक

सिंदखेड लपाली शिवारात गांजाचा पेरा आढळल्याने खळबळ 
* 40 किलो गांजा जप्त; एक अटक
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
       तालुक्यातील सिंदखेड लपाली गावातील एकाच्या घरी आणि शेतात तब्बल ४० कीलोंचा गांजा आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
         सदर धडक कारवाई ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाल्याने  आज २० डिसेंबर २०२३ रोजी सापळा रचून झालेल्या कारवाईत  हा प्रकार उघडकीस  आला. या कारवाईत धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सापळा रचून शेतातील गांजा पोलिसांनी शोधून काढला. 
        मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेड लपाली येथील शेतकरी गोपाल मुंढाळे यांच्या शेतामध्ये व राहत्या घरी गांजा आढळल्याने  पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत  पुढील कार्यवाही सुरू होती.  सदर कारवाई पथकात ठाणेदारासह पोलिस कर्मचारी नितीन इंगळे, मापारी, सोनवणे, रोकडे तथा उत्पादन शुल्क विभागाचे पथक सहभागी होते.