आजही बंधुभावाचा संदेश देणारे हे धार्मिक स्थळ हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक : जाकीर शाह

आजही बंधुभावाचा संदेश देणारे हे धार्मिक स्थळ हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक  : जाकीर शाह
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        बुलडाण्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नांद्राकोळी येथील  मदार शाह मिया चा  दरगाह आहे. त्यांचा संदल  22 एप्रिल 2023 ला जाकीर शाह यांच्या निवासस्थानातुन सध्याकाळी 6 वाजता  गावातून ढोल ताशांच्या गजरात मदार शाह मिया दरगाह वर पोचला. 
     नांद्राकोळी  येथील हिंदू - मुस्लिम इतिहास आणि पौराणिक कथा कोणापासून लपून राहिलेली नाही.  नांद्रकोळी येथे एक असे ठिकाण  आहे, जिथे मंदिरातील  आरती च्या वेळी मदार शाह मिया च्या संदल  मंदिर पर्यंत आले की, आरती होईपर्यंत  था॑बते. आणि येथे हेच एकतेचे दर्शन घडले. दोन्ही ठिकाणी परस्पर समन्वय प्रस्थापित करून बंधुभावाचे उदाहरण वर्षानुवर्षे प्रस्थापित केले आहे. हे आमचे म्हणणे नसून, मंदिराचे भक्तगण व दर्ग्याचे अध्यक्ष जाकीर शाह यांचे म्हणणे आहे.       बसस्थानकाजवळ मंदिर आणि तेथून मदार शाह मियाँची मिरवणूक मंदिरासमोरून जात असते. आरतीच्या वेळी मिरवणूक त्या ठिकाणी आली की, संदल मिरवणूक काही वेळ तिथेच थांबून एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम यांचेही ऐतिहासिक महत्त्व आहे. मदार शाह मिया यांचे दरगाह नाद्राकोळी येथे आहे. जे राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण असल्याचे सांगितले जाते. या गावात कधीही कोणत्याही गोष्टीवरून वाद होत नाहीत, नेहमी ग्रामपंचायत चे सरपंच संजय काळवाघे सहकार्य करीत आहे.
    रमजान असो की नवरात्र असो, परस्पर समन्वयाच्या कार्यक्रमातही बदल केले जातात, मंदिराचे ट्रस्टी आणि भक्तगण व दर्ग्याचे अध्यक्ष जाकीर शाह सांगतात की, आरतीच्या  वेळेमध्ये  समन्वय सधला जातो. दोन्ही ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. जागरण असो, वा कव्वाली , अन्य कोणताही कार्यक्रम असो, दोन्ही धर्माचे लोक सहभागी होतात.