भांडेसंच वाटपात पक्षपात होत असल्याचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेचा आरोप* खामगावप्रमाणे जिल्ह्यातील इतर नोंदीत कामगारांनाही लाभ देण्याची मागणी

भांडेसंच वाटपात पक्षपात होत असल्याचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेचा आरोप

* खामगावप्रमाणे जिल्ह्यातील इतर नोंदीत कामगारांनाही लाभ देण्याची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      भांडेसंच वाटपात पक्षपात होत असल्याचा आरोप शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. खामगावप्रमाणे जिल्ह्यातील इतरही नोंदीत कामगारांना लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा कामगार अधिकारी यांच्यामार्फत सचिव विवेक कुंभारे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

       बांधकाम कामगार मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांपैकी गृह उपयोगी साहित्य संच वाटपाची योजना आपल्या बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा राबविण्याचे धोरण आहे. परंतु वाटप प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील जबाबदार पदावर बसलेले काही लोकांच्या दबावामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे गृहउपयोगी संच वाटप केवळ खामगाव विधानसभा क्षेत्र पुरताच वाटप सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर विधानसभा क्षेत्रातील कामगारांवर स्पष्टपणे अन्याय व पक्षपात होत आहे.
  सदरप्रकरणी आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार संच वाटपाची प्रक्रिया केवळ खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू असून जिल्ह्यातील इतर ठिकाणी बंद आहे. खामगावमध्ये सुद्धा आपल्या पक्षाचे जे कामगार नाहीत त्यांना डावलण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.  
  
         शिवसेनेसारख्या लढाऊ पक्षामध्ये कार्यरत असल्यामुळे आम्हाला या स्पष्ट अन्यायाचे विरोधात सक्रिय होणे गरजेचे आहे. आपणास विनंती की उच्च पदावरून होणारा नोंदीत व जीवित कामगारांसोबत हा पक्षपात त्वरित बंद करण्यात यावा. अन्यथा आम्हाला शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ७ एप्रिल रोजी निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देतांना चांद शाह भिकन शाह विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, मधुकर जोगदंड जिल्हाप्रमुख, सुरेश वावगे, राजीव शेळके, सागर झगरे यांच्यासह आदी उपस्थित होते.