जिल्ह्यात ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक यांनी 24 मार्च 2026 रोजी आयुक्त कार्यालय नागपुर यांच्या पत्रानुसार सार्वजनिक कामासोबतच वैयक्तिक कामासाठी सुध्दा 30 मार्च 2026 पासून NMMS प्रणालीद्वारे मजुरांची उपस्थिती (फेस ऑथेटीकेशन) चेहरा आधारीत प्रमाणिकरण प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या विरोधात जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन तसेच या निर्णयाचे निषेध करण्याकरीता 30 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना ग्राम रोजगार जिल्हा संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देशातील महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांमध्ये रोजगार सहाय्यकांना फिक्स पेमेंट/मानधन लागू आहे, त्यामुळे तेथे सर्व प्रकारची कामे ही फेस ऑबेटोंकेशन प्रणालीद्वारे होतीलही, परंतु महाराष्ट्रामध्ये रोजगार सहाय्यका संदर्भात अन्याय झालेला दिसून येतो.
2 मे 2011 च्या जीआर नुसार ग्रामरोजगार सहाय्यक हे पद अर्धवेळ आहे. त्यामुळे आम्ही पुर्णवेळ काम करण्याची अपेक्षा चुकीची आहे. 3 ऑक्टोबर 2024 च्या जीआर ची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही जोपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत कुठलाच ग्रामरोजगार सहाय्यक कोणतेच ऑनलाईन काम करणार नाही. 2 मे 2011 च्या जीआर ची दुरुस्ती करुन तो पूर्णवेळ करावा. तसेच 3 ऑक्टोबर 2024 च्या जी.आर. ची अंमलबजावणी जर का केली तर महाराष्ट्रातील तसेच आपल्या बुलडाणा जिल्हयातील सर्व रोजगार सहाय्यक प्रशासनाने सोपविलेली सर्व कामे करण्यास तयार आहेत. सदर प्रकरणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत प्रशासनाने आमच्यावर सोपविलेले कोणतेही काम (मंग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो) रोजगार सेवकांमार्फत केले जाणार नाही. सोबतच 24 मार्च 2026 च्या नागपुर आयुक्त कार्यालयामार्फत काढलेल्या पत्राच्या निषेधार्थ बेमुदत कामबंद आंदोलन 30 मार्च 2026 पासून करत आहोत, असेही निवेदनात नमूद आहे..
यावेळी संघटनेचे श्रीमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष, पृथ्वीराज गवई जिल्हा सचिव, संजय मोरे संघटक, ज्ञानेश्वर गावडे जिल्हा उपाध्यक्ष, सुरज रगड जिल्हा सहसचिव, दिपक गवई , अर्जुन ढगे, मदन खरात, दिनकर मोरे, सुरेंद्र कडाळे, ज्योतीराम इंगळे, सुनिल पोरकर, नेपालसिंग राजपूत, संदिप मापारी, विलास कोकाटे, मनोज सातव यांच्या स्वाक्षरी आहेत.
तसेच चिखली ग्राम रोजगार सेवक संघटनाचे वतीने तहसिलदार चिखली यांना एनएमएमएस अॅप प्रणालीव्दारे उपस्थिती फेस ऑथेटिफीकेशन प्रणाली रद्द करण्यासाठी 30 मार्च रोजी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात विविध मागण्याचा संदर्भ दिला आहे. यावेळी दिलेल्या निवेदनावर दिनकरराव मोरे अध्यक्ष, गजानन निळे उपाध्यक्ष, दिनकरराव पडघान सचिव यांच्या सह्या आहेत.
