'अभिता ऍग्रो' चे उपक्रमच "लयभारी"* आता कोकणच्या फ्रेश काजूची चव चाखा बुलढाण्यात !

'अभिता ऍग्रो' चे उपक्रमच "लयभारी"
* आता कोकणच्या फ्रेश काजूची चव चाखा बुलढाण्यात !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          कोकण म्हटलं की, डोळ्यापुढे येतात ते कोकणातील फ्रेश काजू , काजू पासून बनवलेले विविध पदार्थ, या कोकणी काजूची चव तर दीर्घकाळ जिभेवर रेंगाळणारी... आता हेच फ्रेश काजू बुलढाणेकरांच्या चवीसाठी अभिता ऍग्रो ने आणले आहे. 23 मार्च रोजी त्याचा शुभारंभ राजर्षी टावर समोर चिखली रोडवरील सेंटरवर पार पडला. विशेष म्हणजे काजू स्टोअर शुभारंभालाच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. 

         अभिता ऍग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांच्या भन्नाट कल्पना बुलढाणाकरांना आता चांगल्याच परिचित झाल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांची मुशाफिरी वाखाण्याजोगी असते. याच अभिता ऍग्रोच्या माध्यमातून त्यांनी कोकणातील फ्रेश काजू बुलढाणा मध्ये उपलब्ध केले आहे. कोकण आरोमा चा शुभारंभ 23 मार्च रोजी एआर सिटी प्लाझा, दुसरा मजला राजर्षी टावर समोर, चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी दणक्यात पार पडला.                   बुलढाणेकरांनी उपस्थिती लावली. ग्रीन चिल्ली, क्रीम ओनियन पेरी पेरी , कच्च्या कैरी, रोस्टेड शेजवान ,लिंबू मिरी, चीज, चॉकलेट, मेथी मटार अशी चविष्ट फ्लेवर उपलब्ध करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे मार्केट पेक्षा दरही रास्त ठेवण्यात आले आहे. काजू स्टोअर च्या ऑफिसमध्ये ग्राहकासाठी काजूचे विविध प्रकार उपलब्ध आहे. कोकणातील काजूची नैसर्गिक चव आणि त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड झाल्याने वेगळीच लज्जत या काजू स्टोअर ने आणली आहे.

* अभिताने घेतली शेतकऱ्याची काळजी..
         काजू खरेदी करताना अभिता ऍग्रो ने शेतकऱ्यांची देखील काळजी घेतली आहे. कोकणच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून थेट खरेदी म्हणजे उत्पादक ते उपभोक्ता याप्रमाणे हे काजू आणले आहे. त्यामुळे ते ग्राहकांना तर परवडणारे आहेतच मात्र शेतकऱ्यांना देखील दोन पैसे वाढीव देणारे ठरले. स्वरूप पाटील, वैभव सुर्वे हे ही व्यवस्था पार पाडत आहे. अभिता ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे उपक्रम राबविण्याचा मानस कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे.