बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत सिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे.
१६ वर्षीय मुलगी दहावीत शिक्षण घेत आहे. तिचा परिचय आदर्श नरवाडे (वय १९ वर्षे) याच्याशी बालपणापासून होता. याच ओळखीचा फायदा घेत आदर्शने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी, आरोपीने पीडितेची भेट घेऊन तिला एका निर्जन घरात नेले. तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि प्रकृती खालावली. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपी आदर्श नरवाडे याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि युवराज रबडे हे करत आहेत.
