सरकारने अपयशाची कबुली दिली- जयश्रीताई शेळके

सरकारने अपयशाची कबुली दिली- जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नागरिकांना कोरोना काळासारखी तयारी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. यामधून सरकारने आपल्या अपयशाची जाहीर कबुली दिल्याचे स्पष्ट होते, अशी खरमरीत टीका प्रसार माध्यमाशी बोलतांना शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली.
     पुढे त्या म्हणाल्या की, आजची इंधन टंचाई सरकारच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झाली आहे. विरोधक अफवा पसरवतात, असे म्हणून केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, असेही जयश्रीताई शेळके म्हणाल्या.