अभिता कंपनीच्या काजू स्टोअर व मार्गदर्शन केंद्राचे आज उदघाटन

अभिता कंपनीच्या काजू स्टोअर व मार्गदर्शन केंद्राचे आज  उदघाटन 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        अभिता लॅण्ड सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीच्या बुलढाणा येथील काजू स्टोअरचा शुभारंभ आणि मोताळा येथील जमीन, प्रॉपर्टी व कृषीविषयक मार्गदर्शन केंद्राचा उदघाटन समारंभ सोमवार २३ मार्च रोजी संपन्न होत आहे. 

        सोमवारी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील (राजर्षी टॉवर, चिखली रोड) सेठी प्लाझामध्ये काजू स्टोअरचा शुभारंभ होईल. तर साडेअकरा वाजता मोताळा येथील तहसील कार्यालयासमोर जमीन, प्रॉपर्टी व कृषीविषयक मार्गदर्शन केंद्राचा उदघाटन समारंभ होणार आहे. कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिता कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.