संगीत हे मानवी जीवनातील भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम : मालती शेळके

संगीत हे मानवी जीवनातील भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम : मालतीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          संगीत हे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा भाग असून मानवी जीवनातील भावना व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी केले.

          स्थानिक शारदा ज्ञानपीठ च्या खुल्या रंगमंचावर २२ मार्च २०२६ रोजी स्वरविहार संगीत विद्यालयाचा सांजपाडव्या निमित्त हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला, त्यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीत तज्ञ अरविंद टाकळकर, डॉ. गजेंद्र निकम, लताताई गुर्जर, संजय जाधव यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. यावेळी स्वरविहार संगीत विद्यालयाच्या डॉ. मिलिंद जाधव, डॉ. विवेक इंगळे, डॉ. रवींद्र गोफणे, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, अॅड. अमोल देशपांडे, गजानन घिरके, लताताई गुर्जर, शिल्पा डाबेराव, ज्योती खरे, प्रा. रत्नमाला जाधव, प्रसेनजित मोरे, आर्यन सरोदे, अनया डोंगरे, प्रणिका जाधव, अभिनव हिवाळे, विमल काळवाघे, शीला नाफडे, संतोषी झाल्टे, मंजुषा जाधव, प्रतिमा सुरडकर, वैशाली मुंदे, लक्ष्मी सुरोशे, मंदा मानस्कर, नीलम श्रीवास्तव, प्रभावती करे, शैला हिवाळे, प्रिया गोफणे, अश्विनी घिरके यांच्यासह अनेक स्वरविहारच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले.                          त्यांच्यासोबत अमोल दिशागज व प्रकाश खरे यांनी वाद्याची साथ संगत केली. प्रास्ताविक संचालक रविकिरण मोरे, सूत्रसंचालन वैशाली मोरे तर आदित्य गोफने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रविकिरण टाकळकर, अॅड. धीरज मुंदे, प्रा. डॉ. हर्षानंद खोब्रागडे, नानाराव ससाणे, अशोक नाफडे, हर्षल तायडे, अमोल झीने आदींची उपस्थिती होती.