इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो : सतीश पवार* भादोला येथे 'वंचित'तर्फे इफ्तार पार्टी

इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो : सतीश पवार
* भादोला येथे  'वंचित'तर्फे इफ्तार पार्टी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       मुस्लिमबांधवांचे सर्वधर्मीयांसोबत स्नेहाचे, सामाजिक सलोख्याचे संबंध आहेत. मुस्लिमबांधवांनी वेळोवेळी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोपा आणखीनच वृद्धिंगत होतो. त्यासाठी पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी भादोला येथे केले.
        वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तालुक्यातील भादोला येथे ईदच्या पूर्वसंध्येला इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमिलन कार्यक्रमात सतीश पवार बोलत होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो मुस्लिम तथा बहुजनधर्मीयबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तार पार्टीच्या औचित्यावर सतीश पवार यांनी आपल्या मनोगतात इस्लाम हा मानवतावादी धर्म कसा आहे, यावर प्रकाश टाकला.
        याप्रसंगी जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, जिल्हा महासचिव अर्जुन खरात, भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष अनंथा मिसाळ, श्रीकांत गवई, शेख गणी मौलाना, शेख महेमूद, शेख नजिम, शेख अब्दुल हमीद, शेख तौसिफ, शेख रऊफ, शेख जमीर, मोहन सरकटे, शेषराव गवई, संजय गवई, निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.