छ. संभाजी राजांची "सकल मराठा" समाजाच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी होणार जयंती


  छ. संभाजी राजांची  "सकल मराठा" समाजाच्या वतीने  विविध  उपक्रमांनी साजरी होणार जयंती 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     छत्रपती संभाजी राजांनी शिवरायांच्या पश्चात स्वराज्यास आकार दिला. संघर्षविर म्हणून संभाजीराजे इतिहासात अमर आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकल मराठा समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      चिखली येथे अशोकराव चौधरी यांचे निवासस्थानी याबाबत नियोजन बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी  सुनील जवंजाळ पाटील हे होते.
     छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी राजे यांनी शेकडो वर्षापूर्वी प्रगतीचा मूलमंत्र दिला. मात्र सध्या त्यांच्याकृतीशील गतिशील विचारा पासून समाज दूर गेला आहे. त्या विचाराणा उजळ देण्याचा उद्देशाने सकल मराठा समाजाने ,सामूहिक विवाह सोहळा चळवळीचे प्रणेते सुनील पाटील यांचे नेतृत्व 14 मे 2023 रोजी भव्य वधू-वर परीचय मेळावा व सामाजिक उपक्रम आयोजित केले आहे. महाराजाना कृतिशील मानवंदना देता यावी यासाठी वधू-वर परिचय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली येथील अशोकराव चौधरी यांच्या निवासस्थानी याबाबत नियोजन बैठक पार पडली. यावेळी सुनील जवंजाळ  पाटील ,नंदू भाऊ सवडतकर, माधवराव जपे, अरुण गरड, रामेश्वर पाटील ,गजाननराव पोपळे, रमेश बुरकुल ,डॉक्टर दामोदर अंभोरे ,अण्णा साहेब म्हलसने, गोपाळराव जाधव, संजय चिंचोले, रामदास शिंगणे , बाबुराव येवले, दिनकरराव बावस्कर, सुवर्णा तेजनकर, सौ. सुरेखा तेजनकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 1 मे रोजी विस्तारित बैठक अशोक चौधरी यांचे निवासस्थानी चिखली येथे 11 वाजता आयोजित करण्यात आली असून यामध्ये इतर नियोजन करण्यात येणार आहे.
 
* श्री शिवाजी मध्ये परिचय मेळावा :
     श्री शिवाजी विद्यालय चिखलीमध्ये वधू-वर परिचय मेळावा 14 मे 2023 रोजी होत असल्याचे सुनील जवंजाळ पाटील यांनी म्हटले आहे.सर्व मराठा समाज एकत्रित करून भेद, पोटभेद विसरने काळाची गरज आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.