बुलडाणा अर्बनचे सीएमडी डॉ.सुकेश झंवर जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मानित

बुलडाणा अर्बनचे सीएमडी डॉ.सुकेश झंवर जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मानित 
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
     तरुणाई फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात बुलडाणा  अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांना जिल्हाभूषण पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
      बुलडाणा जिल्ह्याचे लौकिक विश्व पातळीवर नेण्यामध्ये बुलडाणा  जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर सुकेश झंवर यांचा मोलाचा वाटाआहे. सामाजिक , शैक्षणिक, औद्योगिक कृषी, व्यापार व देशपातळीवरील अनेक सार्वजनिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात बुलडाणा  अर्बन परिवाराने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. भाईजींच्या नेतृत्वात घेतलेली ही गगन भरारी प्रत्यक्षात साकारण्यामध्ये एक कुशल प्रशासक म्हणून डॉक्टर झंवर यांचे योगदान मोठं आहे. त्यांचा या कार्याची दाखल घेऊन या पुरस्कार साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
 राज्य शासनाचा उत्कृष्ट कला महर्षी पुरस्कार प्राप्त हरिभाऊ राजाराम राऊत यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तरुणाई फाउंडेशनचे प्रमुख पत्रकार कैलास राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेे.  यावेळी झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आलेे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.ए.बळी हे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे, सुनीलजी शेळके, सुनील सपकाळ यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्कार पिठावर ऋषितुल्य व्यक्तिमत्व विवेकानंद आश्रम हिवरा चे अध्यक्ष मालपाणी सर , सप्त खंजिरी वादक संदीप पाल महाराज,  प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी, शेतकरी नेते रविकांत तुपकर, साहित्यिक सदानंद देशमुख, प्रमोद बाप्पू देशमुख, सरपंच किशोर गाभणे, संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी, तुकाराम मगर, डॉक्टर डी. व्ही. सुरूशे, बुलडाणा  अर्बन मेहकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक जोशी साहेब, शाखा देऊळगाव माळी शाखेचे व्यवस्थापक जाधव साहेब व सर्व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा‌. अनिल कलोरे यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मांनले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक व कला रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.

-----------------------------------------
                        अभिनंदन.....