* चिखलीत भाजप आणि शिवसेनेचे मिलीभगत : राहुलभाऊ बोंद्रे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना बहिण म्हणून संबोधतात तर दुसरीकडे श्वेता महाले त्यांना राजकीय विरोधक असल्याचे भासवत आहे. जे लोक भाजपवर नाराज आहे त्यांना काँगेसमध्ये न जावू देता शिवसेनेत पाठविल्या जात आहे. भाजपाला काँग्रेसच ठाम भिडू शकते हे स्थानिक भाजप नेतृत्वाला माहित असल्याने ते महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेला जवळ करत आहे. एकंदरीत ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असा हा प्रकार असून चिखलीत भाजप आणि शिवसेनेचे मिलीभगत असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले.
आज शनिवार ४ एप्रिल रोजी बुलढाणा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले, रेणुका देवी यात्रेनिमित्त बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड चिखलीत आले होते. याच दिवशी ते अचानक घरी आल्याने पाहुणे म्हणून त्यांचे स्वागत केले. चिखलीचे सुस्कृंत राजकारण आहे आणि ते मी जपले याचा मला सार्थ अभिमान आहे. राजकारणाचा स्तर आता खाली गेला आहे, मोदीच्या काळातही संजय गायकवाड भेटायला आले, याचे आश्चर्य वाटले. मात्र राजकीय भूमिका व वैचारिक विरोध यावर ठाम असल्याचे त्यांनी निक्षूण सांगितले. भाजपच मोडस ऑफ ऑपरेंडी ही पॉलिसी देशभरात राबविण्यात माहिर आहे. प्रत्येकांबाबत चर्चा घडवून आणायाची, त्यांच्यावर दबाब टाकयचा आणि त्यांना पक्षप्रवेश करण्यास भाग पाडायचे.. मात्र चिखली विधानसभा मतदार संघात भाजप राबवत असलेल्या या पॉलिसीला काँग्रेसचे पदाधिकारी कधीच बळी पडणार नाही. आगामी काळत काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
* भाजप काँग्रेसला चांगलेच घाबरते :
वाढत्या काँग्रेसच्या प्रभावामुळे चिखलीच्या भाजपच्या तंबूमध्ये घबरहाट सुटली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असतानाही नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँगेसचे भाजपइतकेच १३ नगरसेवक निवडून आले आहे. तसेच काँग्रेसच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही चिखलीकरांनी भरघोस मतदान केले आहे. यामुळे भाजप काँग्रेसला चांगलेच घाबरते, असे राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले.
