* किरण पाटील यांची पुणे पशुसंवर्धन आयुक्तपदी बदली
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या पदावर पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी २ एप्रिल रोजी हा आदेश काढला. डॉ. किरण पाटील यांची बदली पुणे पशुसंवर्धन आयुक्त पदावर करण्यात आली आहे. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते १२ सप्टेंबर २०२३ पासून बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर विराजमान आहेत. त्यांनी आत्मनिर्भर बुलढाणा, महसूल मित्र आणि इंधन साठेबाजी रोखण्यासाठी कडक पावले यांसारख्या उपक्रमांवर भर दिला होता. जिल्ह्यातील इंधनाचा पुरेसा साठा सुनिश्चित करणे, अतिक्रमित रस्ते खुले करणे आणि सरकारी जमिनींचे वाटप आदी कामे त्यांनी मार्गी लावली.
