जागतिक हिवताप दिन निमित्त..... कविता दिलीप प्रधान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित

जागतिक हिवताप दिन निमित्त.....
 कविता दिलीप प्रधान जिल्हास्तरीय प्रथम  पुरस्काराने सन्मानित 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         " रुग्णसेवा हीच इश्वर सेवा" हे ब्रीद समजून ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या व राष्ट्रीय किटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. 25 एप्रिल 2023 रोजी जागतीक हिवताप दिन निमित्ताने सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे कविता दिलीप प्रधान ( आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी,) यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांचे हस्ते श्रीमती प्रधान यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण, आतरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा डॉ. गोफणे, जिल्हा महिला रुग्णालय बुलडाणा प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, सहा. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. होगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबुराव तेलंग, मेहकर तालुका पर्यवेक्षक देविदास जगताप यासह  अधिकारी, कर्मचारी, पुरस्कार प्राप्त आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.याच कार्यक्रमात आरोग्य सेवक धनंजय जाधव ( प्रा. आ. केंद्र जानेफळ)व जे.एस. मिटकरी (प्रा. आ.केंद्र डोनगाव) यांचा ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

-----------------------------------------
                  अभिनंदन.....