राजकिय व प्रशासकिय यंत्रणांचा पाठबळ मिळालेल्या..* आरोपी शिक्षक उबरहंडेवर अखेर निलंबनाची गंभीर कारवाई* कर्तव्यदक्ष सीईओ भाग्यश्री विसपुतेंचा कठोर प्रहार

राजकिय व प्रशासकिय यंत्रणांचा पाठबळ मिळालेल्या..
* आरोपी शिक्षक उबरहंडेवर अखेर निलंबनाची गंभीर कारवाई
* कर्तव्यदक्ष सीईओ भाग्यश्री विसपुतेंचा कठोर प्रहार
बुलडाणा  : (एशिया मंच वृत्त)
        लग्न झालेल्या असतानाही एका मागासवर्गीय मुलीशी खोटा संसार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी शिक्षक गंभीर उबरहंडे याला मिळत असलेल्या राजकिय व प्रशासकिय यंत्रणांचे पाठबळ झुगारून कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सिईओ भाग्यश्री विसपुते यांनी अखेर 25 एप्रील 2023 रोजी आरोपी गंभीर उबरहंडेच्या निलंबनाचे आदेश जारी करून चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर प्रहार केला.
         निलंबन आदेशात म्हटले आहे की, गंभीरराव विनायकराव उबरहंडे, सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रायपुर यांचेविरुध्द संदर्भीय क्र. ०५ नुसार पोलीस स्टेशन बुलडाणा शहर येथे फिर्यादी नामे यशोदाबाई जनार्दन जाधव रा. आंधरवाडी यांनी दि. ०४.०३.२०२३ रोजी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अप नं. १५७ / २३ कलम ३०६ भादवि सह कलम ३ (१) (१), ३३ (१) (ड), ३(२) (f) ३(२)  अजाज अप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे श्री. गंभीरराव विनायकराव उबरहंडे, सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रायपुर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केला असून त्यांना निलंबीत करण्यात येत आहे. मृतक तरुणीची आई, भाऊ आणि मावशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भारत चव्हाण या निलंबनासाठी मागील महिनाभरापासून प्रशासनदरबारी भांडत होते. सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तासल्यानंतर निलंबन प्रक्रियेने गति घेतली. गटविकास अधिकारी बुलडाणा श्रीमती सरीता जे. पवार यांच्या आदेशाने आरोपी गंभीर उबरहंडेला निलंबीत करण्यात आले.