दे. माळी येथे आज विविध सामाजिक कार्यक्रम * ग्रंथतुला,जिल्हाभूषण वितरण,संदीपपाल यांचे कीर्तन

दे. माळी येथे आज विविध सामाजिक कार्यक्रम 
*  ग्रंथतुला, जिल्हाभूषण वितरण, संदीपपाल यांचे कीर्तन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        एखाद्या कलेसाठी जीवन समर्पित करणे ही साधी गोष्ट नाही. देणे घेणे हा जगाचा व्यवहार झाला. मात्र या व्यवहारा पलीकडे जाऊन जीवनभर कलेची साधना केलेले हरिभाऊ राऊत यांचे मूर्ती कलेतील योगदान एखाद्या तपस्वी सारखे आहे. या शिवाय माणूस म्हणूनही त्यांचे मूल्य मोठे आहे.याची दखल घेत तरुणाई फाऊंडेशन ने त्यांचा सन्मान तर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जिल्हाभूषण देऊन सन्मान सोहळा आयोजित केला आहे.संदयाकाली सप्त खणजेरि वादक संदीप पाल यांचे कीर्तन अश्या भरगच्च समाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
       कला महर्षी हरिभाऊ राऊत यांची दखल या अगोदरच महाराष्ट्र शासनाने घेतली असून ते वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त 25 एप्रिल 2023 रोजी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6 वाजता खुले रंग मंदिरासमोर देऊळगाव माळी येथील तरुणाई फाउंडेशन ने भव्य अमृत महोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे. महोत्सव सोहळ्यात हरिभाऊ ग्रंथतुला ,त्यांच्यावर आधारित लघुपट ,पुरवणी विशेषांक व सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.. बुलडाणा अर्बन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेशजी झंवर, अभिता लँड सोल्युशन प्रा. लि. चे सीईओ माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांना जिल्हा भूषण तर देऊळगाव माळी गावचे भूमिपुत्र उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांना देऊळगाव माळी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.ए. बळी सेवानिवृत्त शाखा अभियंता हे असून या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख ,संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, संपादक अशोक सोनवणे, तहसीलदार संजय गरकल, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर , पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बापू देशमुख ,
व्हॉईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष अनिल 
म्हस्के , पत्रकार राजेंद्र काळे ,  अनिलकुमार गाभणे, ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक गणेश निकम केळवदकर, संपादक रणजीत सिंग राजपूत, त्याग मूर्ती आर.बी मालपाणी, सरपंच किशोर गाभणे, उद्योजक किशोर गारोळे, गटविकास अधिकारी गजानन पाटोळे ,वसंतराव मगर, दिगंबर अंभोरे, युवा उपजिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ डोंगरे, विनोद बोरे. मुख्याध्यापक अशोक मगर, माजी सरपंच सुभाषराव मगर, अशोक गाभणे, शासकीय कॉन्ट्रॅक्टर सचिनभाऊ मगर, मा. सैनिक केशवराव सोनवणे पांडुरंग संस्था अध्यक्ष बाबुराव बळी, मुंगसाजी माऊली पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, सुवर्णमाला पतसंस्था अध्यक्ष रामदास काटकर, तुळजाई पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. केशवराव अवचार, गणपती संस्था चे अध्यक्ष विष्णू खरात, ज्येष्ठ नागरिक त्र्यंबक मगर, घाटबोरी सरपंच गजानन चनेवार, पंढरीनाथ देवकर, समर्थ अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष एडवोकेट प्रियंका एस.देशमुख ज्येष्ठ नागरिक नामदेव गवई यासह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे.
      या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याची आव्हान आयोजक तरुणाई फाउंडेशन यांनी केले आहे.