* रमाई मातेसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले सवित्रीबाई सह, सरदार पटेल यांच्या पुतळयांला मान्यता
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा शहर हे थोर पुरुष व महामानवांचे स्मारक असलेले शहर असे नावलौकीक मिळवत असतांना जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या काही थोर पुरुषांच्या पुतळयांची नाहरकत मिळावी या करीता सोमवारी दुपारी जिल्हा परिषद येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महामानवांच्या पुतळांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय जाहिर करण्यात आला. यामुळे नागरिकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बुलडाणा विधानसभेचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या संकल्पनेनुसार शहरातील विविध भागात महामानवांच्या पुतळयाचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास सर्वच समाजातील नागरिकांनी आमदार गायकवाड यांच्याकडे आपल्या समाजातील महापुरुषांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. यातील बहुतांश महामानावांच्या पुतळया संदर्भातील संबंधित विभागाच्या नाहरकत प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुशंगाने सौदर्यकरणाची कामे देखील पुर्णत्वास आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच समाजातील महापुरुषांचे पुतळे लवकरच उभारले जातील अशी ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती.
येणाऱ्या काळात सर्वधर्मिय शहर म्हणून बुलडाण्याच्या नावाची चर्चा होती. मात्र शहरतील जयस्तंभ चौकातील रमाई मातेसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 15 फुटाचा पुतळा, तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सह महात्मा जोतिबा फुले यांचा 15 फुटाचा पुतळा, मोताळा शहरातील पंचायत समितिच्या आवारात नांदुरा रोडवर पाच हजार स्केअर फुट जागेवर भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. तसेच मोताळा नगर पंचायतने सर्वानुमते ठराव घेवून जिल्हा परिषदेकडे मागणी केली हाेती. सदर पुतळयांच्या उभारणी करीता लागणाऱ्या नाहकरतसाठी सोमवारी जिल्हा परिषद येथे आ. संजय गायकवाड यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत सदर पुतळ्यांना नाहरकती सह पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावाला चालणा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सदर महापुरुषांचे पुतळयांचे काम वेगाने पुर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे आता मुख्य अडचण दूर झाल्याने शहरातील नागरिकात उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी बैठकीत मुख्य लेखा अधिकारी व्ही.के. गायकवाड, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, डॉ. प्रशांत पाटील, उप मुख्य कार्यकरी अधिकारी आशिष पवार आदी उपस्थित होते.
