बुलढाण्यात चेस स्कूलचा उपक्रम राबविणार - राध्येश्याम चांडक* फिडे नामांकन राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचा समारोप, ठाणे, नगरचे खेळाडू ठरले विजेते

बुलढाण्यात चेस स्कूलचा उपक्रम राबविणार - राध्येश्याम चांडक
* फिडे नामांकन राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचा समारोप, ठाणे, नगरचे खेळाडू ठरले विजेते
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
       स्पर्धा कुठलीही असो सातत्‍य हे टिकविता आले पाहिजे आज प्रत्‍येक क्षेत्रात स्पर्धा सुरु आहे. प्रत्‍येकाने या स्पर्धेत टिकण्यासाठी परिश्रम व कठोर मेहनत घेतली पाहिजे आणि कठोर मेहनत असल्याशिवाय यशाला गवसनी घलता येत नाही असे आवाहन बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राध्येशाम चांडक यांनी केले.
ते बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित तीन दिवसीय फिडे नामांकन राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमात ग्रॅडमास्टर स्वप्नील धोपाडे, बुलढाणा अर्बनचे सीएमडी डॉ. सुकेश झंवर, संदीप रक्ताडे, आदि मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा ही शुक्रवार 14 एप्रील रोजी प्रारंभ करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन बुलढाणा बुध्दीबळ सर्कल, ऑल इंडिया बुध्दीबळ फेडरेशन आणि महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वयोगटाच्या आतील खेडाळूंचा समावेश करण्यात आला हाेता. या स्पर्धेत नगर, ठाणे, मुंबई, नागपूर, सांगली,औरंगाबाद, पुणे आदी जिल्हातील सुमारे 180 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या बुद्धिबळ स्पर्धाकरिता 78 टेबले लावण्यात आले होते. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी भाईजी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, येत्‍या काळात बुलढाणा येथे चेस स्कूलचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न आपण करणार आहोत. पुढे देखील या स्पर्धेकरीता देशाचे ग्रॅडमास्टर असेच मार्गदर्शन करतील असे आश्वासन देत ग्रॅडमास्टर अभिजीत कुंटे व स्वप्नील धोपाडे यांचे आभार मानले व विजेतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
     दरम्यान स्पर्धेच्या समारोपा दरम्यान ग्रॅडमास्टर अभिजीत कुंटे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना,' हार्ड वर्क, स्मार्ट वर्क' चा संदेश दिला. आठव्या फेरीनंतर मुलांमध्ये आशिष चौधरी( अहमदनगर) हा प्रथम तर प्रथमेश शेरला ( पुणे) हा दुसरा आला. मुलींमध्ये संदिनी भट ठाणे प्रथम, संस्कृती वानखडे( अकोला) द्वितीय, प्रीती पटेल( मुंबई) तृतीय , श्रेया हिप्परगी( सांगली) चतुर्थ तर सानी देशपांडे (संभाजीनगर) पाचवी आली. या सर्वांना लुधियाना येथे १ते ९ मे दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
       या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण ठाकरे यांनी केले. संचलन वैभवी कोलते यांनी केले. या स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, सहायक पंच म्हणून अमृत जोशी, रविंद्र धर्माधिकारी आदींनी काम केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार विद्या मंदिर, बुलढाना अर्बन आदींनी परिश्रम घेतले.

* आत्‍मविश्वास ढासळू देवू नका - ग्रॅडमास्टर स्वप्नील धोपाडे
      खेळाडू आणि विद्यार्थांसाठी आत्‍मविश्वास हा खुप महत्‍वाचा असतो. अनेकवेळा कठोर परिश्रम घेवून देखील यश मिळत नाही. अशा वेळी खेळाडूंचा आत्‍मविश्वास ढासळत जातो, त्‍यामुळे आपला आत्‍मविश्वास हा लॉक होतो. आपला आत्‍मविश्वास लॉक होवू देवू नका. आत्‍मविश्वासावर लक्ष्य केंद्रीत करा व त्‍याला मेंटेन करा, हा मंत्र खेळाडूंनी आत्‍मसात केला तर तुम्ही शंभरटके यशस्वी व्हाल.
* या पेक्षा मोठे यश मिळवावे - डॉ. सुकेश झंवर
     या स्पर्धेसाठी या ठिकाणी खेळाडू सोबत त्‍यांचे पालक देखील आले आहे. मुलांनी या गोष्टीचे भान ठेवावे की त्‍यांचे पालक त्‍यांच्यासाठी खुप परिश्रम घेत आहे. खेळाडूंनी देखील परिश्रम घ्यावे. आज त्‍यांच्यासाठी खुप सुविधा आहेत पूर्वी एवढया सुविधा उपलब्ध न व्हत्‍या या स्पर्धेत खेळाडूंना यश मिळाले आहे. या यशाने खेळाडू भारावून न जाता, यापेक्षा ही मोठे यश खेळाडूंनी मिळवावे.
         राष्ट्रीय स्पर्धेकरीता सानिधी भट ठाणे, संस्कृति वानखेडे अकोला, किर्ती पटेल मुंबई, श्रेया हिंपारगी सांगली, सानी देशपांडे औरंगाबाद, आशिष चौधरी नगर, श्रेला प्रथमेश पुणे यांची करण्यात आली.