समृद्धी महामार्गावर चायगाव जवळ अपघात : महिला जागीच ठार

समृद्धी महामार्गावर चायगाव जवळ अपघात : महिला जागीच ठार
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज झालेल्या अपघातात नागपूर येथील 53 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना  समृद्धी महामार्गावरील चायगावच्या पुलाजवळच हा अपघात आज दुपारी 3.30 च्या सुमारास घडला. 
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूर येथील वर्धा रोड वरील विवेकानंद नगर मधील रहिवासी प्रवीण भास्कर हिंगणीकर (56) हे त्यांची पत्नी सुवर्णा (53)सह क्रिएटा या गाडीने नागपुर येथे जात असतांना समृद्धी महामार्गावर अपघाताचे ठिकाण बनलेल्या चायगाव येथील पुला जवळ गाडीने समोरील मालवाहू गाडी आईशर ला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की क्रिएटा गाडीचा अक्षरशः चुरा झाला आहे. भिषण अपघातात सुवर्णा प्रवीण हिंगणीकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले आहे.
मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या चायगाव जवळ च्या पुलाजवळ हा आठवा अपघात असुन याच ठिकाणी 5 मार्च रोजी ईरटीका गाडीला अपघात होऊन सहा जणांना प्राण गमवावे लागले होते.या संदर्भात वारंवार अपघात घडणार्‍या ठिकाणी तज्ञ अभियंत्याकडून पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र प्रशासनाने या बाबीला गंभीरपणे न घेतल्यामुळे आज एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे. पुढील कारवाई पोलीस करीत आहे.