पदविधर आमदारांनी टपरूट लोकांना सोबत घेवून बैठका घेवू नये* आमदार संजय गायकवाडांचा आ.धिरज लिंगाडेंना सल्ला

पदविधर आमदारांनी टपरूट लोकांना सोबत घेवून बैठका घेवू नये
* आमदार संजय गायकवाडांचा आ.धिरज लिंगाडेंना सल्ला
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       पदविधर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना त्यांच्या कामकाजाबाबत  शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा अधिकार आहे. अशा बैठकांमध्ये सर्वसामान्य नागरिकाला उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा गऱ्हाणे  मांडण्याची अनुमती असू शकते. मात्र काही टपरूट लोकांना सोबत घेवून त्यांच्यासमोर शासकिय अधिकाऱ्याला अत्यंत हिन भाषेत अपमानित करने, त्याचा उपमर्द करने योग्य नाही, असे सांगतानाचं पदविधर आमदारांनी यापुढे टपरूट लोकांना सोबत घेवून बैठका न घेण्याचा सल्ला बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार धिरज लिंगाडे यांना पत्रकार परिषदेतून दिला.
       आज 19 एप्रील 2023 रोजी आमदारांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या मातोश्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एका प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले की, माजी आमदाराने त्यांच्या  पाच वर्षात काय केले. माझे तुलनेत त्यांनी केलेले एक टक्का काम दाखवावे अन् मग क्रॉस करावे. मार्ग न काढता फक्त धमक्या द्यायच्या असे त्यांचे वर्तन आहे मात्र अशा धमक्या देणाऱ्याना आडवं पाडून मी माझा मार्ग काढेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.         आमदार संजय गायकवाड पुढे म्हणाले की, बुलडाणा नगर परिषदेची इमारत 130 वर्षाची आहे. शहराच्या लोकसंख्येत झपाटयाने वाढ होत असल्याने शहराची सीमा पाच किलोमिटर पर्यत वाढली आहे. त्यामुळे भविष्यात नगर पारिषदेचे मुख्यालय त्रीशरण चौकातील डिएड महाविदयालयाच्या जागेत होणार आहे. भूविकास बँकेच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल उभारण्यात येणार आहे. तर शहरातील गांधी भवनाच्या मागील मोकळया जागेत बेरोजगारांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त चौपाटीचे निर्माण केले जाणार आहे. या तिनही जागांना मंजूरात देण्यासंदर्भातील आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरचं काढणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 
       शहरातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी दुकाने बांधून देण्याचे काम नगर पालिकेकडून केले जात आहे. लवकरचं शहर अतिक्रमणमुक्त होईल असेही त्यांनी सांगितले. विरोधकांना ठणकावतांना ते म्हणाले की, विकास कामात अडथळे आणण्याचे काम त्यांनी करू नये. माझे सरकार आहे. मी सरकारी योजनांची कामे आणतो. मी निधी आणतो त्यामुळे विरोधकांनी उगीचं ढवळाढवळ करू नये असा इशाराही त्यांनी शेवटी विरोधकांना दिला. यावेळी बुलडाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे देखील उपस्थित होते.