आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी...* रुग्णाला चांगली सेवा देणे हाच आमचा खरा धर्म : डॉ. दिपक काटकर

आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी...
* रुग्णाला चांगली सेवा देणे हाच आमचा  खरा धर्म : डॉ. दिपक काटकर 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        शहरातील काटकर हॉस्पिटल  चे संचालक सुप्रसिद्ध डॉ. दिपक काटकर एम.डि.मेडिसिन तज्ज्ञ चेस्ट फिजिशियन फुफ्फसा चे आजार निमोनिया ,दम्मा, हृदयरोग, रक्तदाबचे तज्ञ यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, इन्फ्लूएंझा च्या विषाणू ने ग्रस्त रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दिसून येत  आहे. तो वेगाने पसरत आहे. या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि रुग्णांना उच्च ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची लक्षणे जाणवत आहेत. या श्रेणीतील इतर व्हायरसपेक्षा हा विषाणू प्राणघातक असल्याचे असू शकते. त्याची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. यामुळे बाधित झालेले रुग्ण  रुग्णालयात दाखल होत आहेत. त्याची लक्षणे कोरोना व्हायरससारखी असतात, जी 2 ते 3 आठवडे टिकू शकतात. त्याची लक्षणे गंभीर आहेत परंतु ती जीवघेणी नाही.
       गेल्या काही आठवड्यांत हवामानात बदल झाला आहे. बदलत्या ऋतूमध्ये खोकला आणि ताप या सामान्य समस्या आहेत. सामान्य खोकला आणि ताप यातील फरक आणि H3N2 विषाणूमुळे होणारी लक्षणे लोकांना समजत नाहीत ही चिंतेची बाब आहे. कोणत्या इन्फ्लूएंजा विषाणूमुळे लक्षणे उद्भवत आहेत, त्यांचा पीडित व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही काय करावे हे जाणून घेऊ या. इन्फ्लूएंजा या व्हायरसची लक्षणे बहुतांश रुग्णांत आढळत असून, कुटुंबांतील किमान एका व्यक्तीला जरी  ताप आणि सर्दीने ग्रासले तर ते परिवारातील सदस्यांना बाधित करतात , यावर प्रतिबंध साठी मास्क वापरावा. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना आता मात्र सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 
     डॉ. दिपक काटकर पुढे माहिती देताना म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इन्फ्लूएंजा व्हायरसमुळं सर्दी- खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. H3N2 मुळं रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही वाढले आहेत. हवामान बदलामुळं तापाची साथ फैलावत आहे. ताप तीन दिवसांत निघून जातो, पण सर्दी-खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहतो. प्रदूषणामुळे १५ वर्षांखालील आणि ५० वर्षांवरील लोकांमध्ये श्वसनमार्गाच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.
* इन्फ्लुएंजा व्हायरसची लक्षणे कोणती :
     इन्फ्लुएंजाचा संसर्ग झाल्यास ताप, सुखा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, घसा खवखवणे तसंच, नाकातून पाणी येणे, अशी लक्षणे जाणवतात.
* डॉ. दिपक काटकर यांची माहिती :
        इन्फ्लूएन्झा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही होऊ शकतो. परंतु यातून सर्वात मोठा धोका गर्भवती महिला, ५ वर्षाखालील मुले, वृद्ध आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे. याशिवाय, आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनाही इन्फ्लूएंझा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.
* काळजी घ्या.....
* मास्क घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
* डोळ्यांना आणि नाकाला वारंवार हात लावणे टाळा.
* खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा.
* ताप किंवा अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्या. नाहीतर नजिकच्या रुग्णालयात दाखवा असे आव्हान डॉ.दिपक काटकर यांनी केले.