ॲटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी आर्थिक विकास महामंडळाची अर्थ संकल्पात घोषणा* आ. गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे शेकडो बेरोजगारांना मिळणार पाठबळ

ॲटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी आर्थिक विकास महामंडळाची अर्थ संकल्पात घोषणा
* आ. गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे शेकडो बेरोजगारांना मिळणार पाठबळ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         राज्यातील बेरोजगार ऑटोचालक व काळीपिवळी चालक यांना अर्थिक सक्षम करता यावे यासाठी सातत्‍याने पाठपुरावा करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्यामुळे आमदार गायकवाड यांच्या प्रयतनातून ऑटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. या घोषणमुळे राज्यभरातील शेकडों बेरोजगार काळी पिवळी चालक आदिंना मोठया प्रमाणात पाठबळ मिळणार असल्याने ऑटो चालक व काळी पिवळी चालक वर्गात प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. 
        राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ॲटो रिक्षा व काळी पिवळी चालक यांच्या मागणीसह जिल्हयात विकासाची गंगा आणण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्‍नाला यश मिळाल्याचे चित्र आहे. राज्यातील ॲटो रिक्षा व काळी पिवळी चालकासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी लावून धरली होती. सदर मागणीला या अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्‍यामुळे अनेकांना रोजगाराच्या संध्या मिळणार आहे. तसेच जिल्हयातील 
 महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान अलेले चक्रधर स्वामी यांचे जाळीचा देव यासाठी 80 कोटी तर यासह तीन तिर्थक्षेत्रासाठी एकूण सुमारे 300 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली आहे. त्‍यामुळे जिल्हयातीलच नव्हे तर राज्यभरातील महानुभाव पंथ समाजातील नागरिकात उत्‍साहाचे वातावरण आहे. तसेच जिल्हयाला सुजलाम सुफलाम करणारा, वैनगंगा - पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचा पाठपुरावा करुन यासाठी 60 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजने मुळे जिल्हयातील हजारों हेक्टर शेती ही सिंचनाखाली येवून शेतकऱ्यांना यासाठी संजीवनी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात ही उत्‍साहाचे वातावरण आहे.       बुलडाण्यात नुकतेच मागणी करण्यात आलेल्या , कृषी महाविद्यालयाच्या कामास देखील तत्‍काळ सुरुवात करण्याचे सुतोवाच या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्वात महत्‍वाचा असा बोदवड उपसा सिंचनची कामे गतिमान करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. तसेच वर्षानववार्ष पासून रखडलेला खामगांव - जालना या मार्गासाठी तत्‍काळ सर्वेक्षण करण्यात येवून राज्य शासनाचा 50 टक्कयाचा हिस्सा तत्‍काळ भरण्यात यावा व हा प्रकल्प लवकरात लकवर पुर्णत्‍वास नेण्यात यावा ही मागणी देखील आमदार संजय गायकवाड, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमुलकर यांनी संयुक्तीक रित्‍या लावून धरली होती. त्‍यात देखील यश आले आहे. 
     सदर अर्थसंकल्पात जिल्हयात विकासाची गंगा वाहत असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.