शिंदे सरकारकडून खामगांव जालना रेल्वेमार्गाला 'ग्रीन सिग्नल'* आ. श्वेताताई महाले यांचा पाठपुराव्याला यश

शिंदे सरकारकडून खामगांव जालना रेल्वेमार्गाला 'ग्रीन सिग्नल'
* आ. श्वेताताई महाले यांचा पाठपुराव्याला यश
चिखली : (एशिया मंच वृत्त)
             बुलडाणा व जालना जिल्ह्यासाठी बहु प्रतिक्षित आणि विदर्भ मराठवाड्याची भाग्यरेषा ठरणाऱ्या खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने भरावयाच्या हिश्याच्या रकमेची तरतूद केल्याने गत तीन वर्षापासुन सुरु असलेल्या आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नाना यश आले आहे. तसेच खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी काल सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुत्तरित प्रश्नांना उत्तर मिळाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील झुकझुक आगीनगाडीच्या प्रवास आता कुठे सुरू झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ९ मार्च २०२३ ला उपमुख्य मंत्री तथा वित्त मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधान समेत सन २०२३-२४ चा अर्थ संकल्प सादर केला.
      या सादर केलेल्या अर्थ संकल्पात त्यांनी खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्याची भरावयाच्या रकमेची तरतूद केल्याची आपल्या भाषणात उल्लेख केल्याने खामगांव जालना रेल्वे मार्गातील राज्याच्या सर्व अडचणी आता दुर झाल्या आहेत. २०१६ च्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वातील तब्बल ११५ वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वेमार्गाला २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पपात सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली. यासाठी ३००० कोटी रुपयांची तरतूद ही केल्याने खामगाव जालना रेल्वे मार्ग होण्याच्या जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांनतर राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी आपला हिस्सा 'भरावा यासाठी मी बुधवार, दिनांक ४ मार्च २०२० रोजी तारांकित प्रश्न क्र १७०९. विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या महत्त्वपूर्ण विषयाला सभागृहात वाचा फोडली होती. या रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही तत्कालिन परिवहन मंत्री यांनी दिल्याने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक ही घेण्यात आली.
        खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तांत्रिक टीमकडून बुलडाणा व जालना येथे येऊन पाहणी करून गेली. केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी सुद्धा याबाबत बुलडाणा जिल्हयातील सर्व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या रेल्वे मार्गासाठीच्या सव्र्व्हेक्षण करण्यासाठी मान्यता दिली. जालना - खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणास रेल्वे बोर्डाने दिनांक ०८.०२.२०२२ रोजी मान्यता दिली आहे. Field Survey चे काम पूर्ण झाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल कार्यवाहीखाली असून जानेवारी, २०२३ मध्ये रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. तेव्हा पासून आ. श्वेताताई महाले पाटील या रेल्वे मार्गासाठी राज्याने आपला हिस्सा भरावा यासाठी आग्रह धरला होता. परंतु त्यावेळी राज्यात काँग्रेस विदर्भ मराठवाडा विरोधी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांनी या रेल्वे मार्गा बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याच विषयावर त्यांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे युतीचे सरकार आल्याने राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत याकरिता अशा निवडक प्रकल्पांमध्ये ४०% ते ५०% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण शिंदे फडणविस सरकारने स्विकारले आहे. तसेच उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली होती.