धाड येथे रोहीदास जयंती उत्साहात साजरी

धाड येथे रोहीदास जयंती उत्साहात साजरी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
          तालुक्यातील धाड येथे संत रोहीदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास ब्राह्मणे व धनसिंग ब्राह्मणे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परमेश्वर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रामदास ब्राह्मणे यांनी संत रोहीदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच धनसिंग ब्राह्मणे, शिवाजी परमेश्वर यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
       यावेळी  कार्यक्रमाला उपस्थित कैलास ब्राह्मणे, अशोक ब्राह्मणे, रामराव ब्राह्मणे, दिलीप ब्राह्मणे, सुरेश ब्राह्मणे, शाम ब्राह्मणे, अमोल परमेश्वर, दिपक पुरभे, नितीन शिराळे, सागर ब्राह्मणे, भगवान परमेश्वर याच्या सह धाड येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कैलास ब्राह्मणे यांनी केले.