* भास्कर वाडेकर तर बुलडाण्याचे कला महर्षी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चित्रपट निर्मितीचा विचार टिचभर असणाऱ्या बुलडाणा शहरात करने दिवा स्वप्नच ठरेल. मात्र तसा विचार करून आघाडीचे दिग्दर्शक सुधाकर बोकाडे यांच्या सहकार्याने बुलडाण्याच्या भास्कर वाडेकर यांनी फिल्म सोसायटीची स्थापना केली. अलका कुबल सारख्या आघाडीची अभिनेत्री घेऊन निर्मिती केली. गेल्या 27 वर्षापासून हे कार्य ते करीत आहे.
रुपेरी पडद्याने अनेकांना भुरळ घातले आहे. पहिली भुरळ पडली ती धोंडीराज बुवाला आणि हेच नाव आजाराम झालं ते दादासाहेब फाळके रूपान. मराठी माणसाला चित्रपट निर्मितीच स्वप्न पाहायला त्यांनी शिकवल. त्यांनी स्वप्न पडद्यावर उतरविले . दादासाहेबांनी ही स्वप्न कवेत घेऊन आकाशाला गवसणी घातली. पुढे हा मार्ग अनेकांनी चोखळला. यात अनेक जण धुळीस मिसळले आहे. मागास असं बिरुद लागलेल्या बुलडाणा जिल्ह्यात वाडेकर यांनीही असच स्वप्न पाहिलं . 1992 मध्ये बुलडाणा जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहरात सर्वप्रथम कॅमेरा रोल ॲक्शन हे शब्द निनादले आणि ते लगातार दरवळत राहिले ते आजतगायत. फिल्म सोसायटीचे भास्कर वाडेकर यांच्या रूपाने गेल्या ३0 वर्षांपासून कार्य सुरू आहे. भास्कर वाडेकर यांचा जन्म एका खेडेगावातील पोफळी या मोताळा तालुक्यातील गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते बुलडाणा शहरात आले. भाड्याची रूम घेऊन राहिले. चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड असलेले कला महर्षी बाबुराव पेंटर हे मूर्तिकार, चित्रपट निर्माता दिग्दर्शक लेखक होते. आधी ते उत्कृष्ट चित्रकार होते. आणि योगायोगाने हीच बाब वाडेकर यांच्या बाबतीतही लागू पडते. निसर्गात रमणारा व्यक्ती निसर्ग चित्रात निश्चित रमतो. चेहऱ्यावरील भाव भावभावंनांचा अभ्यास करणारे व्यक्ती निश्चितच व्यक्ती चित्रात नैपुण्य मिळतो. आणि याला भास्कर वाडेकर अपवाद नाही. त्यांचे मित्र मंडळी त्यांना प्रेमाने पेंटर बाबू असे हाक मारतात. हा कमालीचा योगायोग आहे. बुलडाण्यात चित्रपट निर्मितीचा त्यांनी संकल्प केला व हा संकल्प त्यांनी तडीसही नेला. न्याय ,अन्याय , प्रहार अशा कितीतरी चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक सुधारकर बोकाडे यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 1992 रोजी बुलडाणा फिल्म सोसायटीची पहिली निर्मिती कर्तव्य च्या रूपाने सुरू झाली. 23 ऑगस्ट 2022 मध्ये बुलडाणा फिल्म सोसायटी तीन दशकाचा सोहळा पूर्ण केला आहे. त्यांचा पहिला प्रयत्न कर्तव्याचे रूपाने अपयशी ठरला. सुरुवातीला अपयश पोचविणे मोठी धक्कादायक बाब असते परंतु वाडेकरांनी अपयश हसत हसत स्वीकारून पुढचे पाऊल टाकले, जिद्द मनात ठेवली आणि त्यांच्या जिद्द नामक लघु पटाला पुढे विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. भास्कर वाडेकर म्हणजे एक जिद्द आणि ध्येय वेडा माणूस. पहिल्या अपयशा पासून तर त्यांनी सगळे लक्ष आघाडीच्या नटाकडे केंद्रित केले आणि अलका कुबल, तुषार दळवी, सुधीर जोशी यांना एकत्र घेऊन त्यांनी 1995 मध्ये अंतरंग ची निर्मिती केली. याच अंतरंगाने मराठी दूरदर्शनचा पहिला पडदा पाहिला. त्यानंतर राजा , विजय हे बालचित्रपट आकारले. विजय व छोटा जादूगर रिळ चे चित्रपट होते हे विशेष.
परंतु थिएटर ला अजूनही बुलडाणा फिल्म सोसायटीचे दर्शन झाले नव्हते आणि खंत आणि जिद्द मनात ठेवून शेगावचे गजानन महाराज चरित्र असलेला "देव माझा शेगावीचा गजानन" विद्येची देवता, युगप्रवर्तक, सावित्रीबाई या चित्रपटानी पडदा उज्वल केला. सामाजिक विषयाला हाताळणारा सौ माझी सौभाग्यवती हा स्त्री शिक्षण व बेटी बचाव चा संदेश देणारा चित्रपट सुद्धा थेटरला झळकला. अशी नको सुनबाई; नवरा वरचढ बायको, हीच बायको पाहिजे हे विनोदी चित्रपट आले.त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांनी तीन बाल चित्रपट ,एक टेलिफिल्म, सहा पूर्ण लांबीचे चित्रपट, 30 लघु चित्रपट, 16 माहिती पट अशा प्रकारची निर्मिती करून शेकडो कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आज भास्कर वाडेकर यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव सुरज वाडेकर निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे निश्चितच बुलडाणा जिल्ह्यात त्यांनी रचलेला पाय आता कळसही होणार असे म्हणता येईल.
विविध पुरस्काराही दिले
बुलडाणा फिल्म सोसायटीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्काराने गौरवांकित केले आहे. कला, साहित्य, पत्रकारिता ,वैद्यकीय, शिक्षण ,विज्ञान, नाट्य, चित्रपट शाहीर ,लोक कला ,आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याना ते दरवर्षी सन्मानित करतात. यावर्षी सुद्धा बुलडाणा फिल्म सोसायटी पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.