* केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 खरीप हंगामाकरीता बुलढाणा जिल्हयातील 472584 शेतकऱ्यांसाठी नव्याने 635 कोटी 74 लाख रुपये मंजूर झाले आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली असुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 या खरीप हंगामा करीता पीक विमा कंपनीने 144 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. जिल्हयातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासुन वंचीत राहले होते. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहीजे, असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बुलढाणा जिल्हयातील 472584 शेतकऱ्यांना 635 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकसान भरपाईची वाढीव रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. याशिवाय राज्य शासनाकडे जिल्हयातील 160 दावे प्रलंबित आहेत. या संदर्भांतही कृषि मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असुन ही प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचा फायदा बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहीती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे.