* सर्व धर्मांना जोडणारा सेतू म्हणजे शिवविचार- हारून मास्टर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शिवाजी महाराजांचे विचार पाहिले तर असंख्य पैलू दिसू लागतात. मुख्यत्वे स्त्रियांचा आदर,, कुराण व परधर्मीय विषयी कमालीची सहिष्णुता व सर्वांसाठी न्याय धोरण महाराजांनी दिले. त्यांचे विचार जाती धर्मापुरते मर्यादित कधीच नव्हते ते धर्मातीत म्हणजे मानव मुक्तीकडे झुकलेले होते. असे प्रतिपादन मुस्लिम समाजसेवक हरून मास्टर यांनी केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयात आज मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवीत यंदाची शिवजयंती "दणक्यात साजरी'' करण्याचा निर्णय घेतला. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांनी सर्व समाज घटकांना शिवजयंतीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्कट प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी शिवरायांचे निष्ठावंत सुभेदार तानाजी मालुसरे यांना अभिवादन करण्यात आले. हरिभक्त परायण डॉक्टर विकास बाहेकर यांनी शिवचरित्र व इतिहासाची दुसरी बाजू विचारात घेण्याच आवाहन केले. इतिहास आहे तसा लिहिला गेला असता तर विसंगती दिसली नसती. आज जे हे घडले असेल का? यावर विचारा करावा लागतो असे सांगून शिवचरित्राचे उपेक्षित पैलू मांडून हिंदू -मुस्लिम एकतेसाठी सभा घेण्याची वेळच येऊ नये अशी कृती आपल्याकडून व्हावी अशी अपेक्षा ह.भ.प. बाहेकर यांनी व्यक्त केली.तर प्राध्यापक एन. एच. पठाण यांनी सर्वच महापुरुष वाटले गेले तरी शिवराय सर्वांसाठी आजही खुले आहेत. शिवरायांची लढाई स्वातंत्र्यासाठी" मानवाच्या कल्याणासाठी होती असे सांगितले. प्रसंगी डॉक्टर गणेश गायकवाड यांनीही विचार मांडले संचलन व आभार प्रदर्शन गोपालसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास हकीम रहमत, अ.हमीद , रियाज काजी,अ. जब्बार अ हमीद, सय्यद सर, याकूब शेख, मोहम्मद अफसर, सय्यद यासीन, प्राध्यापक जगदेवराव बाहेकर, डॉक्टर राजेश्वर उबरंडे ,पत्रकार गणेश निकम, संदीप वानखेडे, अंजली परांजपे ,वैशाली ठाकरे, अनिता कापरे ,संजय खांडवे, ऍडव्होकेट जावेद शेख आदी उपस्थित होते.
डॉक्टर शोन सच्चे पाईक
शिवाजी महाराजांचा विचार जोडणारा विचार होता सर्व घटकांना घेऊन महाराजांनी कार्य केले हाच विचार शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले पुढे नेता आहेत. असे सांगून शायर डॉक्टर गणेश गायकवाड यांनी डॉक्टर चिंचोले यांचे कौतुक केले. बुलडाणा शहरांमध्ये जेव्हा कधी कौमी एकतेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळे शोन यांचे कार्याची नक्कीच नोंद घेतली जाईल असे गौरवोद्गार डॉक्टर गणेश गायकवाड यांनी काढले.