स्टेअरींग जाम झाल्यामुळे मेहकर-खामगाव बस दुर्घटनाग्रस्त * चालक वाहकासह 29 प्रवासी जखमी

स्टेअरींग जाम झाल्यामुळे मेहकर-खामगाव बस दुर्घटनाग्रस्त 
* चालक वाहकासह 29 प्रवासी जखमी
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
      मेहकर वरून खामगावकडे जाणाऱ्या बसचे जानेफळ जवळच्या पाथर्डी घाटात स्टेरींग जाम झाल्यामुळे बस दुर्घटनाग्रस्त झाली. या घटनेत चालन व वाहकासह बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना 4 फेब्रुवारी रोजी मेहकर-खामगाव दरम्यान पाथर्डी घाटात दुपारी बारा वाजे दरम्यान घडली.
      प्राप्त माहिती नुसार अधिक वृत्त असे की खामगाव आगाराची बस क्रमांक एम एच ४० एन ८२८९ ही मेहकर वरून खामगाव कडे जात असताना जानेफळ नंतर असलेल्या पाथर्डी घाट संपत आल्या नंतर गाडीचे स्टेरींग अचानक जाम झाले.अचानक अशी बिकट परिस्थिती उदभवल्या नंतर सुद्धा चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकावली.या दरम्यान गाडीला मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन मोठा अपघात घडला.या अपघातात चालक विवेक आश्रुजी काळे ४८ रा.खामगाव यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असुन मुक्का मार लागला आहे. वाहक बाळु भाऊजी गव्हाळे ५४ रा.खामगाव यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.तसेच रजियाबी शे. वजीर ५५ शेगाव,अश्विनी कैलास राठोड १६ पाथर्डी, हरिभाऊ त्रंबक सोळंके ७५ अनुसया हरिभाऊ सोळंके ६५ दोघे राहणार पारखेड ,मनोरमा गबाजी मिसाळ ७२ मलकापूर पांग्रा,प्रयागबाई जनार्दन खराटे ६३,शरद जनार्दन खराटे २७ दोघे राहणार जोगेश्वरी ता.रिसोड, कासाबाई बबन अवचार रा.कोठा ता.मालेगाव, अब्दुल रशीद अब्दुल कादीर ७२ बाळापूर, अरमान अली अकबर अली १७ रा.खामगाव, रेखा चव्हाण, वेदिका जाधव, कोमल राठोड, राणी जाधव, सोनू जाधव, स्नेहा चव्हाण सर्व रा. पारखेड, अमित जाधव, घनशाम जाधव, भावेश राठोड,कविता गोपाल, ऋतुजा जाधव हे जख्मी झाले.  अपघाताचे वृत्त कळताच पाथर्डी गावाचे सरपंच विशाल जाधव,धनराज सोळंके,कैलास राठोड,कैलास जाधव किशोर जाधव,पिंटू राठोड,ऋतिक जाधव आदींनी जखमींना गाडी बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेव्दारा मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मेहकर आगाप्रमुखांची अशीही अनास्था
       अपघात झाल्यानंतर चालक वाहकासह जखमी प्रवाशांवर मेहकर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र अपघात झाल्यानंतर चार तासानंतर सुद्धा मेहकर आगाराच्या एकही जबाबदार अधिकाऱ्याने जखमी चालक वाहका सह प्रवाशांची साधी भेट सुद्धा घेतली नाही.