तलाठ्यास चारशे रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक* गुन्हा दाखल

तलाठ्यास चारशे रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक
* गुन्हा दाखल 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       तालुक्यातील रायपूर येथील तलाठी भाग एक प्रकाश उबरहंडे यांना आज ८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमरावती लाच लुचपत पोलीस अधीक्षक मारुती जगताप तसेच बुलडाणा लाच लुचपत पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन इंगळे व त्यांचे पथक प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, स्वाती वाणी यांनी सापळा रचून रायपूर तलाठी कार्यालयासमोर तलाठी प्रकाश उबरहंडे यांना चारशे रुपयाची लाच घेताना लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले.
      सदर घटनेबाबत वृत्त असे की, तक्रारदार पांगरी येथील रहिवासी असून त्यांनी ३० जानेवारी २०२३ रोजी बुलडाणा लाच लुचपत विभागाला तक्रार दिली होती. तक्रारीत नमूद आहे की, त्यांचे वडील २०२२ मध्ये मृत्यू झाले होते. सातबारा वारसदार लावण्यासाठी तलाठी प्रकाश उबरहंडे यांनी पैशाची मागणी केली होती, त्यानुसार तलाठी प्रकाश उबरहंडे यांना पांगरी येथील तक्रारदार यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी तलाठी दुपारी २ वाजे दरम्यान कार्यालया समोर चारशे रुपये दिले असता बुलडाणा लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडून रायपूर पोलीस स्टेशनला नेले व तलाठी प्रकाश उबरहंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले हे पुढील कारवाई करणार आहे.