मोताळा : (एशिया मंच वृत्त)
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या बुलडाणा अर्बन को ऑ केडीट सो. मार्या. बुलडाणा या पतसंस्थेच्या कोथळी शाखेचे व्यवस्थापक सुनिल मोहनलाल गांधी, लिपिक सतिष घनश्यामदास राठी व मधुकर दगळू सावळे यांनी आपले पदाचा गैरवापर करून संगणमताने कोथळी 1 कोटी 37 लक्ष 59 हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सचिन झंवर वय 40 वर्ष यांच्या फिर्यादीवरून तिघा विरुद्ध विविध कलमा अनुसार सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सदरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापक सुनिल मोहनलाल गांधी, लिपिक मधुकर दगळू सावळे यांना आज मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी विद्यमान न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पर्यत 7 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
सचिन घनराजजी झंवर वय 40 वर्ष राहणार शास्त्री नगर मलकापूर यांनी बोराखेडी पोलिसांना दिलेल्या फिर्यादी वरून बोराखेडी पोलिसांनी सुनील मोहनलाल गांधी वय 42 राहणार नांदुरा, सतिष घनशामदास राठी वय 40 राहणार मोताळा, मधुकर दगडु साळवे वय 52 राहणार मोताळा यांच्या विरुद्ध अप क्रमांक 63/2023 च्या कलम 409, 420, 465, 468, 471, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पुढील तपास पोलीस ए.पी.आय विकास पाटील करीत आहे.