* जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांची पत्रकार परिषदेत माहिती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हाधिकारी कार्यालयात जेंव्हापासून मुख्यमंत्री सचिव कार्यालय सुरू झाले तेंव्हापासून आतापर्यँत ३४ तक्रारी प्राप्त झाल्या असून यातील १० तक्रारी स्थानिक असल्याने अर्थात तहसीलदार, एसडीओ यांच्या कक्षेत येत असल्याने त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या सर्वचं तक्रारींचा निपटारा होईल असेचं नाही, कारण ज्या तक्रारी येथे सुटल्या नाहीत तर त्या मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालय येथे पाठविले जातात. त्याचा निर्णय ते घेतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, काही तक्रारी ह्या न्यायालयीन प्रक्रियेत असताना सुध्दा काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे दिसून आले. अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सचिव कार्यालयात येथे जमा करू नये कारण त्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच काही तक्रारी ह्या पेन्शनर संदर्भात ही प्राप्त झाल्या तर अश्या तक्रारी या कार्यालयात दाखल करू नये. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी तूम्मोड, उपजिल्हाधिकारी गीते, मुख्याधिकारी पांडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांची उपस्थिती होती. सैलानी यात्रा संदर्भात माहिती देताना सांगितले की, यात्रेचे नियोजन करण्या करिता नुकतीचं एक बैठक घेण्यात आली. यामध्ये भाविक भक्तासाठी पाणी टँकरची अधिक प्रमाणात उपलब्धता होईल यावर सैलानी ट्रस्ट व प्रशासनामध्ये चर्चा झाली असल्याचे सांगून ज्या जागेवरून पाणी साठा पुरवण्यात येईल. तिथे पाण्याचे नमुने तपासून पुढे ज्या ठिकाणी वाटप करायचा तेथेही पाण्याचे नमुने तपासले जाणार आहे. दोन्ही ठिकाणी तपासणी करून यात्रे करूच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याचे ही जिल्हाधिका-यानी सांगितले. मनोरंजनासाठी यात्रेत लागणारे टूरींग टॉकीज, आकाश पाळणा यांना सुद्धा परवानगी देण्यात येणार असून १०० ते १२५ सी. सी. टी.व्ही. कॅमेरे यात्रेच्या ठिकाणी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.