लोणार : (एशिया मंच वृत्त)
प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रशांत तेजनकर यांच्या मार्गदर्शननाखाली 9 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरात गरोदर माता , स्तनदा माता, 0 ते 5 वर्षाखालील बालक व बाल आरोग्य तपासणी सह बाल पोषण आहार, महिला आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी हिरडव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकी अधिकारी डॉ. प्रशांत तेजनकर, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद शेख, जनसमुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण काळे, डॉ हर्ष कांबळे, औषध निर्माण अधिकारी हिंगमिरेे, आरोग्य सहाय्य भोडणे चीरमाडे, आरोग्यसेविका खोंदील, सुनीता मुखमुले, शिंदेे, नितीन मुंढे, अंगणवाडी सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडवचे सर्व कर्मचारी यांनी या आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले.