मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनाचे औचित्‍य साधत 27 कोटी 34 लाख रुपयाच्या कामाचे आमदर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनाचे औचित्‍य साधत 27 कोटी 34 लाख रुपयाच्या कामाचे आमदर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत बुलडाणा विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन प्रादेशिक कार्यक्रम योजने अंतर्गत 27 कोटी, 34 लाख रुपये किमतीची येळगाव व दोन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले. हे भूमिपूजन 9 फेब्रवारी 2023 रोजी सकाळी बुलडाण्याचे आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख राजेश मुंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, युवासेना तालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, भाजपा तालुका प्रमुख सुनील देशमुख, वाहतूक सेना तालुका प्रमुख कुलदीप गावंडे, हतेडी सरपंच प्रशांत गाढे, अमोल तायडे, पोखरी सरपंच सौं. जयश्री संतोष टेकाळे, माळविहीर सरपंच सौं. अर्चनाताई आडवे, येळगाव सरपंच दादाराव लवकर, येळगाव उपसरपंच सौ प्रिया सुमंत इंगळे आदी यावेळी उपस्थित होते. 
        आ. संजय गायकवाड यांच्या विकास कामाचा झंझावात शहरी भागासह ग्रामीण परिसरात ही दिसून येत आहे. जेवढया वेगाने आमदार संजय गायकवाड हे विकास कामे मंजूर करुन आणत आहेत, तेवढयाच वेगाने ही कामे देखील पुणत्‍वास जात असल्याचे चित्र आहे. मतदार संघातील येळगाव विस्तारीत, पोखरी व माळविहिर विस्तारीतमध्ये नागरिकांना पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्याने पाणी समस्या हा गंभीर विषय बनला आहे. अशी तक्रार नागरिकांनी आ. संजय गायकवाड यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेतली. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्‍य साधत आ. संजय गायकवाड यांनी मतदार संघातील येळगाव, पोखरी व माळविहिर येथे जलजीवन मिशन प्रादेशिक कार्यक्रम अंतर्गत 27 कोटी 34 लाख रुपयाच्या येळगाव व दोन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मंजूरात मिळवून निधी उपलब्ध करुन दिला व प्रत्‍यक्ष कामास देखील सुरुवात करुन दिली. या योजनेत 103. कि.मी.ची वितरण व्यवस्था व ग्रव्हीटी मेन असून डिआय, एचडीपीई, पीव्हीसी या सर्व प्रकारातील पाईप सदर योजनेत वापण्यात येणार आहे. या योजनेतील कामामुळे परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी संपणार असल्याने परिसातील नागरिकात उत्‍साहाचे वातावरण आहे. यावेळी पोखरी येथील उपसरपंच सविता बबन गायके, माळविहीर उपसरपंच सौ नंदाताई मिसाळ, शिवसेना विभाग प्रमुख सुमंत इंगळे, शिवसेना विभाग प्रमुख श्रीकृष्ण धंदर, संजय आडवे, भीमराव आडवे, शिवानंद आडवे, बबलू देशमुख, मदन आडवे, मनोज म्हाळणकर, सुजित काळे, शंकर जाधव, शुभम हिवाळे, श्रीकांत खिरडेकर, कैलास मानमोडे, शुभम शिलारकर, संदीप वाघ, सोनू आडवे, मीराताई राऊळकर, विनोद आडवे, सचिन आडवे, गजानन गडाख, विनायक देशमुख, विजय गडाख, प्रकाश शेळके, तुकाराम किकराळे, गजानन पडोळ, अशोक गडाख, मधुकर एकडे, दगडू वाघ, साहेबराव एकडे, मारुती एकडे, सचिन आडवे, शुभम हिवाळे, आकाश चौधरी,वैभव अकोटकर, पांडुरंग एकडे,प्रज्वल भोंडे, ऋषिकेश वाघ, यश रनाळकर, हर्षल बुरुकुल, हेमंत कंकाळ, वैभव सोनुने, आदित्य देशमुख, पंकज शिंदे, योगेश खीर्डेकर, प्रतिक चौधरी,गौरव वैरागडे, धीरज कांबळे,सुरज कांबळे, श्रीकांत खिरोडकर,राहुल वाघमारे,आकाश सपकाळ, सुशांत रिंढे, सुनील भाकरे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, दीपक तुपकर आदी उपस्थित होते. 
       योजने अंतर्गत बनणार पाच पाण्याच्या टाक्या सदर योजने अंतर्गत येळगाव विस्तारीत, पोखरी, माळविहिर या परिसरात एकूण पाच पाण्याच्या टाक्या बनविण्यात येणार आहे. पोखरी येथे पाण्याची टाकी बनविण्यात येणार असून या टाकीची क्षमता 55 हजार लीटर असून यासाठी तब्बल 17 लाख 71750 रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर माळविहीर येथे 28 लाख 27 हजार 200 रुपये पासून 1 लाख 20 हजार लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बनविण्यात येणार आहे. येळगाव येथे 13 लाख 27470 रुपयाची तथा 25 हजार लीटर क्षमतेची तर येळगाव विस्तरीत परिसरात 63 लाख 66 हजार 250 रुपयाची व 4 लाख 30 हजार क्षमतेची माळविहीर विस्तारीत भागात 3 लाख 60 लीटर क्षमतेची टाकी उभारली जाणार आहे. यासाठी 66 लाख 27 हजार 300 रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.