चिखलीमध्ये महाजन दाम्पत्याने गणेश स्थापनेनिमित्त केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देखावा

चिखलीमध्ये महाजन दाम्पत्याने गणेश स्थापनेनिमित्त केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देखावा
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
       सन २०२२ मध्ये स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाल्याचे निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देशभरात सुरु असून दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान देशभर राबविण्यात आलेले आहे. या अभियानाच्या प्रेरणेतून चिखली येथील  जयेश व सौ. जान्हवी महाजन यांनी घरी स्थापन केलेल्या गणपती भोवती या अभियानाबाबत टपाल तिकिटे व नाणी यांच्या सहाय्याने अतिशय सुंदर, आकर्षक व माहिती देणारा देखावा सादर करण्यात आला आहे.
       महाजन दाम्पत्याने या देखाव्यामध्ये भारताचा राष्ट्रध्वज कसा अंतिम तयार केला गेला व आताचा ध्वज तयार करणारे पिंगली व्यंकय्या यांचेवर टपाल खात्याने काढलेले तिकिट, भारतीय राष्ट्रगान वंदे मातरम् वर तसेच वंदे मातरम् लिहिणारे बकिमचंद्र चॅटर्जी वर काढलेले टपाल तिकिट स्वतंत्र भारताचे प्रथम डाक तिकिट ज्यावर भारताचा राष्ट्रध्वज असून असून ‘जयहिंद’ लिहिलेले आहे. कच्छ राज्याचे जयहिंद लिहिलेले नाणे, स्वातंत्र्यास २५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सन १९७२ मध्ये चांदीचे १० रुपयांचे नाणे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने काढलेली रुपये २, ५, १० व २० ची नाणी तसेच तिरंग्यावर काढलेले टपाल तिकिट, स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहिद झालेल्या थोर व्यक्तींवर काढलेली टपाल तिकिटे सन १८५७ चे उठावापासून ते १९७२ च्या चले जाव आंदोलनापर्यंत झालेले उठाव व आंदोलने यावर काढलेली टपाल तिकिटे व नाणी, सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेने काढलेले नाणे व टपाल तिकिटे यांच्या आधारे सुंदर देखावा तयार केला असून सोबतच त्याबाबतची सर्व माहिती देऊन नवीन पिढीला माहिती करुन दिलेली आहे. विषेश म्हणजे त्यांच्याकडे इसवी सन पुर्व ६०० पासूनची अत्यंत जुनी नाणी असून अत्यंत सुंदर डाक तिकिटे सुद्धा आहे. त्यांच्या घरी हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करत आहे.