* सहाव्या वर्गाची अनुशा मरयम प्रथम क्रमांकावर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरातील उर्दू हायस्कूल येथील भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
या निमित्त उर्दु हायस्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्दु एज्युकेशनचे अध्यक्ष शेख रहीम, सचिव सैय्यद यासीन, मुख्याध्यापक शेख अखतर उपमुख्याध्यापक सैय्यद , मंचावर उपस्थितीत होते. शिक्षक दिना निमित्त वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमा मध्ये भाग घेतला होतला होता.
भारतीय संस्कृतीत आई नंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. अनुशा मरियम याला त्यांची आई शिक्षिका असल्यामुळे व वडिल शाहिद कमर हे अभियंता असल्याने घरात शिक्षणाचा अधिक महत्त्वाचा वाटा आहे.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे संचालन काझी रईसोद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन सैय्यद दाऊद यांनी केले. यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.