* धामणगाव बढे येथील ठाणेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारी 2022 रोजी शहीद शेर ए हिंद हजरत टिपू सुल्तान( र.अ) यांच्या बद्दल अपशब्द वापरले यामुळे तमाम मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली. याचेच प्रत्यय तालुक्यातील धामणगाव बढे येथील मुस्लिम बांधवांनी नुकतेच ठाणेदार यांना निवेदन देऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी केली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, टिपू सुल्तान यांनी अनंत हिंदुत्वावर अत्याचार केले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करतो. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक कारवाई करावी, जनतेशी माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी अलिम कुरेशी, अँड वसीम कुरेशी, सय्यद बिस्मिल्लाह, रशीद पटेल, हाफ़िज़ शेख सादिक, ज़मीर कुरेशी, शेर ए हिंद युवा बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अलिम शाह, शेख कलीम, असलम खान, शेख मुजफ्फर सर व सादिक खान उपस्थित होते.
