* रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा डॉ. रवी शिंदे
* रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल डॉ. रवि शिंदे यांचा माशा अल्लाह ग्रुपतर्फे सत्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हामान्य रुग्णालयातील नेत्रशल्य चिकीत्सक डॉ. रवी शिंदे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तडस यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षात पाच हजार पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया करून गरजू रुग्णाच्या डोळ्यांना नव संजीवनी देण्याचे कार्य केले. या कार्याबद्दल त्यांचा बुलडाणा येथील माशा अल्लाह ग्रुपच्या वतीने
डॉ. रवी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माशा अल्लाह ग्रुपचे अध्यक्ष शेख सईद,जाकीर शाह नाद्राकोळीकर, शेख सोहिद, पत्रकार साबीर अली, हाजी सलीम, दय्यान अहेमद, मो. मुझफर उपस्थिति होते.
या छोटेखानी कार्यक्रमाची माहिती देत माशा अल्लाह ग्रुपचे अध्यक्ष तसेच समाज सेवक शेख सईद यांनी सांगितले की, वृद्ध रुग्ण हे मोतिबिंदूने त्रस्त असतात. अलीकडच्या काळात रुग्ण सेवेला भरारी देण्यात यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रकाश झोतात आलेले डॉ. रवी शिंदे यांच्या बाबतीत आवर्जून सांगावे वाटते की, आता पर्यंत त्यांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या तेवढ्या यशस्वी झाल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक लोकांना खर तर हेच माहित नसते की, सरकारी दवाखान्यात मोतिबिंदू तसेच अनेक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. खर तर मोतिबिंदू हा आजार जास्त करून वृद्धांमध्ये आढळून येते. तरी या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन समाजातील मोतिबिंदूने त्रस्त रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा, जास्तीत जास्त शस्त्रक्रियाचा लाभ मिळावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. रवी शिंदे यांनी संगीतले की, माशा अल्लाह ग्रुपचे अध्यक्ष शेख सईद यांचे सामाजिक कार्य पाहून खरे तर आनंद होत आहे. तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया रुग्णाला अडचणी किंवा काही माहिती असल्यास त्यांनी नेत्रशल्य चिकीत्सक यांच्याशी संपर्क साधावा, तसेच वृद्ध गरजू व्यक्तीने आपली शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करावी असे आवाहन ही त्यांनी केले.
