नेहरु युवा केंद्र अंतर्गत स्वराज प्रशिक्षण केंद्रामध्ये युवक आणि महिलांसाठी एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सिंदखेडराजा : (एशिया मंच वृत्त) युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत येणार्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा यांच्या मार्फत सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा स्थित स्वराज प्रशिक्षण केंद्रामध्ये सशक्त भारत अर्थात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत निरोगी युवक आणि महिलांची सकारात्मक जीवनशैली या विषयावर एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम चे आयोजन केले होते. या विषयावर बोलण्यासाठी आर्युवेद व पंचकर्म मध्ये BAMS झालेल्या डॉ.ठोसरे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी कोरोना कालावधी दरम्यान घेण्याची काळजी आणि बदलत्या जिवनशैली बरोबर आहाराचे सुयोग्य नियोजन बद्दल उपस्थित तरुण-तरुणीना आणि माहिलांना माहिती सांगितली तसेच एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिलेची प्रेरणादायी कथा सांगून युवकांना कोरोनाच्या वाढत्या कालावधीत खंबीर राहण्याचा सल्ला दिला.
फिट इंडिया विषयावर इंडियन आर्मी चे माजी पराकमांडो ऑफिसर रणजितजी खोटे सर यांनी उपस्थितांना निरोगी आणि दिर्घआयुषी जिवनासाठी व्यायमाचे महत्व पटवून दिले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बुलडाणा येथील तज्ञ प्रशिक्षक अविनाश खिल्लारे यांनी बेरोजगारांसाठी लघुउद्योक आणि महिलांसाठी गृह उद्योगांबद्दल माहिती सांगून कार्यक्रमात अधिक सकारात्मकता निर्माण केली.
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सिंदखेडराजा तालुका कोषाअध्यक्ष श्रीमान समाधान सरकटे सर यांनी स्वराज प्रशिक्षण केंद्राद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल प्रशिक्षण केंद्राची प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या अध्ययस्थानी शेलोडी ग्रामपंचयातचे सरपंच श्रीमान समाधानजी रेठे साहेब उपस्थित होते.
स्वराज प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष मंगेश राजगुरु यांनी नुकतेच गोवा येथे पार पडलेल्या युवा ऑलिपिंक स्पर्धेत ग्लोड, सिल्वर, बॉझ मेंडल पटकवलेल्या युवकांना आणि त्यांच्या पालकांना आमंत्रित करून प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या युवकांमुळे मातृतिर्थाची मान भारत देशात अभिमानाने उंच झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नेहरू युवा केंद्राचे स्वयंमसेवक देवानंद नागरे सर यांनी युवा सप्ताह दरम्यान घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेचे सम्मानचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली.
