* 30 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त
* एलसीबीची कौतुकास्पद कामगिरी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या धान्याचे गोडावून फोडुन शेतमाल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद चावरीया यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांना याबाबत स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्या अनुसार दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी ग्राम उंद्री येथील बुलडाणा अर्बन च्या गोदाममधील सोयाबीनचे 69 कट्टे अंदाजे किंमत 1 लाख 69 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत पोलीस स्टेशन अमडापुर येथे विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रमाणे जिल्ह्यात झालेल्या सर्व चोंऱ्याच्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासली असता झालेल्या सर्व चोऱ्याची पद्धत ही एक सारखीच असल्याचे समजल्याने व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फारुख शहा मेहबुब शहा राहणार सामी प्लाट पातुर जिल्हा अकोला याने आपल्या सहकार्या सोबत केली असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाल्याने फारुख शहा हा वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे लग्नाला येणार असल्याने पथकातील अधिकारी यांनी सापळा रचून आरोपी फारुख शहा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा शेख जहांगीर शेख हमजा, शाहरुख उर्फ रहेमान शहा मेहबुब शहा व अन्य एक फरार आरोपी यांच्या सोबत मिळुन चोरी केली असल्याची माहिती दिली. पथकाच्या वतीने शोध घेऊन शेख जहांगीर शेख हमजा, शाहरुख उर्फ रहेमान शहा मेहबुब शहा याला ताब्यात घेण्यात आले व उर्वरित एका फरार आरोपीचा शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. आरोपींना विचारपुस केली असता जिल्ह्यात देऊळगाव राजा, चिखली, मेहकर, लोणार येथे प्रत्येकी दोन वेळा तर जानेफळ येथे 1 अश्या विविध ठिकाणी 10 चोऱ्या केल्या असल्याचे कबुली आरोपींनी दिली असुन चोरीतील 200 क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत 14 लाख, 80 क्विंटल तुर अंदाजे किंमत 6 लाख 40 हजार, दोन चार चाकी वाहन अंदाजे किंमत 10 लाख, मोबाईल कटर अंदाजे किंमत 22 हजार असा एकूण 30 लाख 62 हजार रुपयांचा सर्व मुद्देमाल पातूर येथील व्यापाऱ्यांच्या गोडावून व राहत्या घरामधून जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, बजरंग बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बळीराम गिते, सायबर पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, पोलीस निरीक्षक अमडापुर नागेश कुमार चतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुमार सानप, पोलीस उप निरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार सुधाकर काळे, पुरुषोत्तम आघाव, राजु आडवे, गजानन गोरले, विजय सोनोने, कैलास ठोबरे, चालक रवी भिसे, सचिन जाधव यांनी केली.
