जिल्हा परिषद शाळा घारोड येथील विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन अमरावतीसाठी निवड

जिल्हा परिषद शाळा घारोड येथील विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन अमरावतीसाठी निवड
बुलडाणा :  (एशिया मंच वृत्त)
     जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घारोड येथील विद्यार्थी शाम ज्ञानेश्वर परकाळे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 5 वी स्कॉलरशिप परीक्षेत ग्रामीण भागातून खामगाव तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तसेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सुद्धा झळकला होता. त्याच्या या यशाच्या जोरावर अमरावती येथील शासकीय विद्यानिकेतन प्रवेशासाठी तो पात्र ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
        शाम हा एका शेतमजुराचा मुलगा असून त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा गरीब कुटुंबातील मुलाला विद्यानिकेतन अमरावती येथे प्रवेश मिळणे ही खरच अभिमानास्पद बाब आहे.
       या आधीही सन2019 मधे इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. आचल ढोले ही शिष्यव्रुत्तीच्या गुणवत्ता यादीत येऊन नवोदयसाठी पात्र ठरली होती व नवोदय शेगाव येथे ती गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहे.शाम हा त्याला मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेल.
      तो त्याच्या यशाचे श्रेय आई-वडील ,वर्गशिक्षक  सावळे सर व कु. भुंबरे मँडम, काळे सर ,भोलनकर सर ,हिवराळे सर, खरात सर, तिलेवाड, सर वाईकर सर या सर्व शिक्षकांना देतो. कोरोना काळातही मुलांना योग्य मार्गदर्शन करून विद्या निकेतन प्रवेशपात्र बनविल्याबद्दल शिक्षकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.