बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यातील सामाजिक , धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमवटणारे फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार आपल्या ओघवत्या वानितून करणारे कुणाल पैठणकर यांना नेर जि . अमरावती येथील महाबोधी ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणारा माणाचा धम्मभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. ३ जानेवारी 2022 रोजी नेर येथे होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर लेखक साहीत्यिक यांना हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येते. विविध क्षेत्रातील सखोल अभ्यास , उत्कृष्ट वक्ता व माणसं जोडण्याची कला असलेल्या कुणाल पैठणकर यांचे विविध सामाजिक सांस्कृतीक क्षेत्राशी जवळचे संबंध आहेत . आम्ही धम्म बांधव या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी व त्यांच्या टिमने कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये शहर व परिसरातील गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करून मोठा दिलासा दिला. दि ग्लोबल बुध्दीस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून एक नवा पायंडा त्यांनी पाडला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दरवर्षी १,२ व ३ फेब्रुवारी रोजी नेर येथे भव्य धम्मपरीषद आयोजीत करण्यात येते या परीषदेच्या तिसऱ्या दिवशी विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
