अखिल भारतीय मारवाडी महिला मंचच्या वतीनेमकरसंक्रांत निमित्त हळदी, कुंकू स्पर्धा संपन्न

अखिल भारतीय मारवाडी महिला मंचच्या वतीने
मकरसंक्रांत निमित्त हळदी, कुंकू  स्पर्धा संपन्न
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मारवाडी महिला मंचच्या वतीने 29 जानेवारी 2022 रोजी शहरातील जनता चौक स्थित अग्रेसन भवन येथे दोन्ही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांत निमित्त हळदी, कुंकू आणि स्वाद अलबेला स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाले.
     यामध्ये हळदी कुंकू ही स्पर्धा सौ. गौरी तातेड, सौ.श्रेया दालमिया यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. यामध्ये सौ. दीपिका अग्रवाल, सौ. ममता
लाहोटी, सौ. अदिती दिनोदे व सौ. शीतल मावतवाल यानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधून प्रथम विजेत्या सौ. दीपिका अग्रवाल तर दुस-या विजेत्या सौ.
ममता लाहोटी या ठरल्या. यासह स्वाद अलबेला हि स्पर्धा सौ. दीपा वर्मा आणि अनामिका शर्मा यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. यामध्ये सौ.पूजा गांधी,
सौ. गीता रघोनी, सौ. अदिती दिनोदे, सौ. रश्मी अग्रवाल, सौ. शीतल मावतवाल, सौ. राधिका अग्रवाल यांनी सहभाग घेतला होता. यामधून प्रथम विजेत्या सौ.
शीतल मावतवाल तर दुस-या विजेत्या सौ. रश्मी अग्रवाल या ठरल्या. या स्पर्धे करिता मंडळाच्या अध्यक्षा सौ. कल्पना मुंदडा यांनी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारणी सदस्यां सौ. ममता झंवर, सौ. सपना अग्रवाल, सौ. वर्षा जैन, सौ. अस्मिता अग्रवाल व किरण चिरानिया
यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. किरण भडेच यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परिक्षक म्हूणून श्रीमती सुमन बाहेती व देवश्री ठाकूर यांनी काम पाहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
स्पर्धा घेतांना सर्व नियम अटी काटेकोर पणे पाळूनच या स्पर्धा घेण्यात आल्या.