बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक जिजामाता महाविदयालय येथे कार्यरत शारिरीक शिक्षक तथा संचालक डॉ. प्रा. आत्माराम राठोड यांची कन्या कु.निकिता राठोड इंग्रजी विषयाच्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. सध्या निकिता जिजामाता महाविदयालयात इंग्रजी विषय अध्यापनासाठी तासीका तत्वावर कार्यरत आहे. ती आपल्या या यशाचे श्रेय जिजामाता महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, प्रा. सुबोध चिंचाले व इतर प्राध्यापकांना देते.निकिता ने प्राप्त केलेल्या यशाबददल नुकताचं तिचा पत्रकार प्रेमकुमार राठोड, सोनू चव्हाण, गजानन चव्हाण व रामेश्वर चव्हाण यांनी सत्कार केला.
