बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी युवकास बुलडाणाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.एन. मेहर यांनी 4 वर्षाची शिक्षा व 1000 रूपये दंड ठोठावला.
अधिक वृत्त असे कि, दे. राजा येथील रहिवासी फिर्यादी ने दे. राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की, तिची बहिण घरी एकटीचं असताना आरोपी मनोहर अमीन भोसले याने रंग लावण्याच्या बहाण्याने घरात घुसून पिडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच याबाबत कोणास काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. उपरोक्त फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपीच्या विरूध्द भादंवि कलम 8 पोक्सो कायदयानुसार व कलम 354 (अ) 1 (आय), 452, 324, 506 अनुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक शिवाजी सिंगनवाड व पोलीस उपनिरिक्षक मंजुषा मोरे यांनी आरोपींविरूध्द बुलडाणा येथील विशेष् न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 7 साक्षिदार तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादी व पिडिता फितुर झाले असताना ही सरकारी वकील अॅड संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडून पिडिता अल्पवयीन असल्याचे न्यायालयात सिध्द केले. त्यामुळे न्यायधिश मेहरे यांनी आरोपी मनोहर अमीन भोसले याला पोक्सो कायदयानुसार 4 वर्षाची शिक्षा व 1000 रूपये दंड ठोठावला. कोर्ट पैरवी पोहेका सुनील साळवे यांनी सहकार्य केले.
