* ग्रामपंचायत सरपंच विनोद राठोड यांनी पाडला कौतुकास्पद पायंडा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मोताळा तालुक्यातील गोतमारा, हनवतखेड गट ग्रामपंचायतवर प्रजासत्ताक दिनाच्या महोत्सवी वर्षां निमित्त युवा सरपंच विनोद देवसिंग राठोड यांनी स्वतः चा मान, सन्मान बाजूला ठेवून भारतीय सैन्य दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक अविनाश राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायतवर राष्ट्रध्वज फडकविण्याचा कौतुकास्पद पायंडा पाडला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोतमारा ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून युवा सरपंच विनोद देवसिंग राठोड यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध विकास कामे करून सोबतच आदर्श उपक्रम राबविले जात आहे, जेणेकरून विकास पासून कोसो दुरु असलेल्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राठोड हे सातत्याने करत असतात, ग्रामीण भागात सरपंच पद म्हटले की स्वतःला काहीतरी समजतात ,मात्र विनोद राठोड हे सुशिक्षित तरुण तडफदार युवा सरपंच असल्याने त्यांनी आपल्या पदाचा मान सन्मान बाजूला ठेवून गावातील माझी सैनिक अविनाश राठोड यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत वर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान देऊन त्यांचा गावकऱ्र्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला . गोतमारा ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ही पहिली वेळ असेल की माझी सैनिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला असेल , या कार्यक्रमाला ग्रामपंचायत चे सचिव पंधाडे , मुख्याध्यापक माडीवाले ,तसेच सर्व सदस्य ,आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
