* जिल्हा परिषदेच्या १५ वा वित्त आयोग अबंधीत निधीतून कामास मान्यता
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
साखळी बु. जि. प. सर्कलमधील अजिसपूर- साखळी बु. रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन २६ जानेवारी 2022 रोजी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या १५ वा वित्त आयोग अबंधीत निधीतून या रस्त्याच्या खडीकरण कामासाठी ५.४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तालुक्यातील अजिसपूर ते साखळी बु. दरम्यान पांदण रस्ता आहे. दोन्ही गावांतील शेतकरी शेतात जाण्यासाठी या पांदण रस्त्याचा वापर करतात. मात्र पावसाळ्यात पांदण रस्त्याने शेतीकामासाठी जाण्यात अडचणी येतात. शेतात अवजारे, साहित्य, शेतमाल, बैलगाडी, नेणे आणणे सोयीचे होत नाही. त्यामुळे दोन्ही गावांना जोडणाऱ्या या पांदण रस्त्याचे खडीकरण व्हावे, अशी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. जयश्रीताई शेळके यांनी मागणीची दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या १५ वा वित्त आयोग अबंधीत निधीतुन ५. ४२ लाख रुपयांचा निधी सदर रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर अजिसपूर- साखळी बु. या रस्त्याच्या खडीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कामाचे भूमिपूजन जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते झाले.
यावेळी पंचायत समिती सभापती उषाताई चाटे, अजिसपूरच्या सरपंच संध्याताई जगताप, उपसरपंच सचिन सिरसाट, ग्रा.पं. सदस्य बाळाभाऊ जगताप, सौ.अनिता विष्णु पवार, संतोष गायकवाड, सौ.अनिता अनिल पवार, ग्रामसेवक बी.एस.हिवाळे, गजानन पवार, मंगलाताई पवार, सविताबाई पवार, दुर्गाताई व्यवहारे, अपेक्षाताई पवार, अंजनाताई पवार, नंदाताई पवार, जगदेव महाजन पवार, रामेश्वर पवार, संजय कोलते, राजू हिवाळे, समाधान पंडित, मोतीराम पवार, भगवान पवार, प्रल्हाद पवार (महाराज), अशोक पवार, कैलास चव्हाण, कैलास जगताप, रंगनाथ जगताप, संदीप किलबिले, श्रीराम गवई, भुजंगराव पवार, सुरेश पवार, जगदेवबाबा पवार, मनोहर पवार, निवृत्ती पवार, गजानन जगताप, विनोद जगताप, नामदेव पवार, रंगनाथ जगताप, केशव मुळे, बाळू पवार, अशोक पवार, मंगेश नाईक, विजय पवार, गोटूभाऊ जगताप, शेषराव जगताप ,विठ्ठल पवार, शेनफट शिरसाट, गजानन काटे,सुभाष जगताप, दत्ता काटे, संजय शिरसाट, दिनकर शिरसाट, भिका पवार, मनोहर मुळे, मनोज जयस्वाल, प्रकाश पाहुणे, प्रल्हाद नाईक, राजू शिरसाट, श्रीकृष्ण पवार, नारायण पवार, बळी पवार , समाधान पवार, शिवा पंडित, शिवाजी पवार यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
