महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी विष्णू वाघ यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी विष्णू वाघ यांची नियुक्ती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     मेहकर येथील झुंजार पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता विष्णू वाघ यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईशी संलग्नीत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बुलडाणा यांची एक कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. सदर नियुक्ती  ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष भानुदास लकडे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने, उपाध्यक्ष रविंद्र वाघ यांच्या आदेशान्वये सदरहू नियुक्ती करण्यात आली.
      आज दि. २५ जानेवारी २०२२ रोजी वार मंगळवार दुपारी ३ वाजता संघटनेच्या कोरकमिटीची बैठक बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे संपन्न झाली. यावेळी विदर्भ उपाध्यक्ष भानुदास लकडे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत व्यक्त केले तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने यांनी जिल्ह्यात पत्रकारांची एकजुट व संघटनात्मक कार्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे ते बोलत होते. तर उपाध्यक्ष रविंद्र वाघ यांनी आपल्या मनोगतातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तळागळातील पत्रकारांसाठी अहोरात्र मेहनत घेवू असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. सदर कोरकमिटीच्या बैठकीला सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण, जिल्हासंघटक शौकत शाह, प्रेमकुमार राठोड, सुनिल मोरे, विष्णू वाघ, अनिल मंजूळकर, शेख इद्रीस, शेख असिफ, अशफाक कुरेशी आदीची प्रामुख्याने उपस्थिती लाभली व एकमताने विष्णू वाघ यांच्या निवडीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.