प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिर

 प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आरास ले-आउट, डॉ.जी.बी.राठोड यांच्या दवाखान्यामागे, बुलडाणा या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात रक्त लघवी तपासणीसाठी 25 टक्के सुट, ईसीजी 50 टक्के सुट, एक्स-रे 50 टक्के सुट तथा रूग्ण तापसणी मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरात बालरोग तज्ञ डॉ.रामलाल वैराळकर, डॉ.विजय निकाळे, डॉ.प्रसाद अग्रवाल, डॉ. निलेश टेकाळे, डॉ.सुनिल राजपूत, डॉ. स्वप्नील उबरहंडे, डॉ.माधुरी चाटे, डॉ.मोहिनी खेडकर, डॉ.संजय गवळी, डॉ.वृषाली गवळी, डॉ.मारोती चाटे, डॉ.चैतन्य जाधव, डॉ.शैलेश गडाख, डॉ.स्वाती टेकाळे, डॉ.अनंता मगर, डॉ.सोनाली निकाळे, डॉ.रूचिरा जाधव, डॉ.विजय सोळंकी, डॉ.ऋषीकेश निकम, डॉ. सुशील चव्हाण व डॉ. विश्वास खर्चे आदी तज्ञ रूग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या शिबिराचा बुलडाणा शहर व तालुक्यातील रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलच्यावतीने करण्यात आले आहे.