चांडक ले -आऊटमधील संरक्षण भिंतीचे लोकार्पण

चांडक ले -आऊटमधील संरक्षण भिंतीचे लोकार्पण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण झालेल्या चांडक ले- आऊट, सुंदरखेडमधील संरक्षण भिंतीचे २३ जानेवारी 2022 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
      अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषाताई पवार होत्या. उदघाटन जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सभापती उषाताई चाटे, जि. प. सदस्य सविता बाहेकर, सुंदरखेडच्या सरपंच अपर्णा चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अर्चना इल्लरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक चांडक ले- आऊटमधील रेणुकानगरातील मोकळ्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी त्या भागातील नागरिकांची मागणी होती. मुलांना खेळण्यासाठी, जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वापर व्हावा या हेतूने ही मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. या जागेवर कुणीही अतिक्रमण करु नये यासाठी येथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करण्यात येत होती. जि. प. सदस्य जयश्रीताई शेळके यांनी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनिषाताई पवार यांनी मागणीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधकामासाठी २२.४७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. दरम्यान रविवारी या संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राजेश शेळके, विजय इल्लरकर, कमलेश चंदन, सावन परिहार, वैभव मुळे, विश्वनाथ तायडे, सुरेंद्र देशमुख, संदीप शेळके, विष्णू धुरडे, आतिष काकडे, प्रकाश नागरे, धनंजय बाहेकर, मोहन मुळे, राजेश वाघ, नंदू गवई, नारायणराव देशमुख, किलबिले साहेब, के. ओ. शिंगणे, उज्ज्वल चव्हाण, कुणाल खडसे, श्रीराम बोरे, विठ्ठल चव्हाण, केतन देशमुख, विजय परिहार,दत्ता गायकवाड, भाऊराव देशमुख, खार्डे साहेब, नागरे साहेब, सौ. हर्षा खडसे, सौ. मंगल शेळके, सौ. छाया मुमले,सौ.मायाताई शिंगणे, सौ. ज्योती पोटे, सौ. शिल्पा मुळे, सौ. कविता लाटे, ऋतुजा शेळके, समु लाटे यांच्यासह जय हनुमान सेवाभावी ट्रस्टचे पदाधिकारी व रेणुकानगरमधील नागरिक उपस्थित होते.